कारंजा लाड ... मागील एक वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे कारंजा तालुक्यातील सर्व खासगी कोचिंग क्लासेस बंद असून विद्याथ्र्यांना ऑनलाईन पध्दतीने स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाचे धडे दिल्या जात आहे. परंतु या ऑनलाईन प्रक्रियेत कनेक्टिव्हिटीमुळे खोळा निर्माण हेात असल्याने तसेच ग्रामीण भागातील काही विद्याथ्र्यांकडे ऑन्ड्राॅईड मोबाईल नसल्याने त्या विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान हेात आहे. क्लासेस सुरु करण्याची परवानगीची मागणी तहसीलदारांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
शासनाने लग्न समारंभ , सभा, बस, रेल्वे व आस्थापनात कोरोना नियमांच्या आधारावर २५ लोकांच्या उपस्थितीसाठी परवानगी दिली आहे. त्याच आधारावर खासगी कोचिंग क्लासेसना देखील परवानगी देण्यात यावी अशी मागणी खासगी कोचिंग क्लासेस असोेसिएशनच्यावतीने ४ मार्च रोजी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. कारंजा तालुक्यात जवळपास ८० कोचिंग क्लासेस असून ६०० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी त्यात काम करतात. मागील एक वर्षांपासून हे कोचिंग क्लासेस बंद असल्याने त्यांचा व त्यांच्या परिवाराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे खासगी कोचिंग क्लासेसना परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी खासगी कोचिंग क्लासेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. स्वप्नील बाकल, उपाध्यक्ष प्रा. गौरव जाधव, सचिव प्रा मोहसिन अली व कोषाध्यक्ष प्रा गणेश काकडे यांच्यासह खासगी कोचिंग क्लासेस संचालकांची उपस्थिती होती.