रस्ता दुभाजक उभारण्याची मागणी
वाशिम : शहरातील पुसद नाक्यावर वाहतुकीची नियमित वर्दळ राहते. चारही दिशांनी दिवसभर वाहने सुसाट वेगात धावतात. यामुळे मुख्य चाैकात दर्जेदार दुभाजक उभारण्यात यावेत, अशी मागणी प्रमोद बनसोड यांनी केली आहे.
सौरऊर्जा वापराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
वाशिम : अपारंपरिक ऊर्जास्रोत म्हणून सौरऊर्जा वापरावर भर देण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र प्रशासकीय कार्यालयांमध्येच त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष पुरविणे गरजेचे आहे.
वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण
वाशिम : वनविभागाच्या जमिनीवर काही ठिकाणी अतिक्रमण झाले असून, काही लोकांनी जमीन वहितीखाली आणली आहे. त्याचा शोध घेऊन अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहे.
वाहतूक विस्कळीत
वाशिम : पाटणी चौक व रिसोड नाका येथे विशेषत: सकाळच्या सुमारास वाहतूक विस्कळीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.