वाकळवाडी हे आदिवासीबहुल गाव आहे. वाकळवाडी रस्त्यावर महादेवाचे हेमाडपंथी मंदिर असून, या मंदिरात भाविकांची नेहमी वर्दळ असते. त्याचबरोबर मेडशी येथील अनेक शेतकऱ्यांची शेतीही याच मार्गावर असल्याने महामार्गाच्या निर्मितीमुळे त्यांच्या शेतीची वहिवाट अडचणीत आली आहे. त्यातच मेडशी-वाकळवाडी हा रस्ता एमडीआरमध्ये असून, येथे अंडरपास ब्रिज न दिल्यास भविष्यात अनेक अडचणी आणि समस्या उद्भवणार आहेत. त्यामुळे या बायपासवर अंडरपास देण्याची मागणी होत आहे. आमदार अमित झनक यांनी याच समस्यांबाबत कार्यकारी अभियंता झालटे व कंत्राटदारांशी चर्चा केली. त्यावर संबंधित कार्यकारी अभियंता यांनी येत्या आठवड्यात पाहणी करण्याचे ठरविले असून, या बायपासवर अंडरपास मंजूर होत नाही, तोपर्यंत या रस्त्याचे काम बंद करण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायतीकडूनही करण्यात आली आहे. यावेळी माजी सभापती शेख गनीभाई हाजी शेख चांदभाई, सरपंच शेख जमीर शेख गनीभाई, माजी सरपंच डॉक्टर सुभाष मंत्री, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मधुकर बहादुरे, प्रदीप पाठक, प्रदीप तायडे, गजानन शिंदे आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रीय महामार्गादरम्यान वाकळवाडी बायपासवर अंडरपासची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:27 AM