लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तालुक्यात १३ फेब्रुवारीला अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन शेकडो हेक्टर जमीनीवरील पिकांचे नुकसान झाले. तथापि, महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करून बाधीत शेतक-यांना भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती विरेंद्र देशमुख यांच्यासह इतरांनी उपविभागीय अधिका-यांकडे १४ फेब्रुवारीला निवेदनाव्दारे केली आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे, की १३ फेब्रुवारीला वाशिम तालुक्यातील काटा, कोंडाळा, तोरनाळा, सुराळा, कार्ली, किनखेडा या गावांमध्ये अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामुळे गहु आणि हरभरा या पिकांचे अतोनात नुकसान झाले. आधीच दुष्काळाच्या छायेत असलेला तालुक्यातील शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे अधिकच पिचला गेला आहे. प्रशासनाने ही गंभीर बाब लक्षात घेवून नुकसानग्रस्त भागांचे विनाविलंब पंचनामे करून बाधीत शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी पंजाब पतंगे, राजू देशमुख, उमेश पवार, विठ्ठल देशमुख, सुरेश देशमुख, प्रसाद देशमुख, किशोर सरनाईक, तेजराव जाधव, दीपक देशमुख, रमेश पवार, प्र.सु.देशमुख आदिंची उपस्थिती होती.
गारपिटीने बाधीत गावांचे तत्काळ पंचनामे करा - वाशिम तालुक्यातील नुकसानग्रस्तांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 8:33 PM
वाशिम : तालुक्यात १३ फेब्रुवारीला अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन शेकडो हेक्टर जमीनीवरील पिकांचे नुकसान झाले. तथापि, महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करून बाधीत शेतक-यांना भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती विरेंद्र देशमुख यांच्यासह इतरांनी उपविभागीय अधिका-यांकडे १४ फेब्रुवारीला निवेदनाव्दारे केली आहे.
ठळक मुद्देउपविभागीय अधिका-यांना दिले निवेदन