पाण्याचा वापर काटकसरीने करा
वाशिम : एकबुर्जी प्रकल्पाची पाणीपातळी तुलनेने घटली आहे. यामुळे आगामी काही दिवस नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी केले आहे.
रस्त्यावरील हातपंप काढण्याची मागणी
वाशिम : रिसोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या स्थानिक पाटणी कमर्शियल काॅम्प्लेक्ससमोरच्या मुख्य रस्त्याला लागूनच जुना हातपंप अद्याप कायम आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून, पाणी उपलब्ध नसलेला हा हातपंप काढून घ्यावा, अशी मागणी होत आहे.
मोकाट श्वानांमुळे नागरिक त्रस्त
वाशिम : शहरातील काही भागात विशेषत: रात्रीच्या सुमारास मोकाट श्वान अंगावर धावून येण्याचा प्रकार बळावला आहे. यामुळे वाहनचालक, नागरिक त्रस्त झाले असून, न.प.ने या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. हा प्रकार शहरातील अल्लाडा प्लाॅट परिसरात माेठ्या प्रमाणात दिसून येत आहे. न.प. ने लक्ष देण्याची मागणी आहे.