लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा घरेलु असंघटीत महिला कामगारांच्या मागण्या प्रलंबित असून, याविरोधात काँग्रेसने आवाज उठविला आहे. प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी घरेलू महिलांसह काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले. महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली असंघटीत क्षेत्रातील कामे करणाºया महिला कामगारांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. घरेलु महिला कामगारांना आयएलओच्या निकषाप्रमाणे फायदे देण्यात यावे, घरेलु महिला कामगार कल्याणकारी मंडळाव्दारे पुर्ववत योजनेचे फायदे मिळावे, कल्याणकारी योजनांचा समावेश करावा, घरेलु कामगार महिलांना पेन्शन लागु करावी, त्यांना स्वस्त पुरवठा धान्य योजनेतुन लाभार्थी म्हणुन स्वस्तधान्य केरोसीन मिळण्यात यावे, बचत गटाच्या माध्यमातुन व्यवसाय करणाºया महिलांसाठी कर्जपुरवठा व इतर सोयी उपलब्ध कराव्या, अल्पसंख्यांक महिला बचत गटाचे मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाकडे असलेली प्रलंबीत कर्जप्रकरणे त्वरित निकाली काढावी, सदर कामगार महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षा प्रदान करावी, त्यांच्यावरील अन्याय व अत्याचाराला प्रतिबंध लावण्यात यावे व असंघटीत महिला कामगारांना रात्रपाळीवरचे काम देण्यात येवु नये आदी मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष अॅड.दिलीपराव सरनाईक व जिल्हा असंघटीत कामगार काँग्रेसचे अध्यक्ष राजुभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी काँग्रेस कमेटीचे माजी तालुकाध्यक्ष परशराम भोयर, सेवादलचे जिल्हाध्यक्ष विशाल सोमटकर, चांदबी शेख हाशम, फिरोजाबी शेख महेबुब, समीनाबी शेख इस्माईल, दिपमाला ज्ञानेश्वर पाईकराव, जुलेखा बी शेख महेमुद, आरिफाबी महेमुद याकुब, परजानाबी अब्दुल कलीम, सिमा परवीन शेख सलीम, आशा राजु रोकडे, संगीता संतोष भडके, सुरेश धोडुपंत रत्नपारखी आदिंची उपस्थिती होती.
असंघटीत महिला कामगारांच्या मागण्या प्रलंबित; काँग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 5:56 PM