कनिष्ठ अभियंता अमोल नवरे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे की, १८ जून रोजी रात्री ते व तंत्रज्ञ हर्षल खंडारे, नारायण नवघरे, अमोल पाटील हजर असताना तोरनाळा येथील रवी चाैधरी, जगदेव सावके, महादेव चाैधरी, महादेव कंकाळ यांनी उपकेंद्र कार्यालयात येऊन ‘लाईन नेहमीच कशी काय जाते’, असे म्हणत प्लॅस्टिकच्या खुर्च्या फेकल्या. काठीने काचेच्या खिडक्या व कंट्रोल पॅनलचे काच फोडून नुकसान केले. मी समजविण्यास गेलो असता, लोटलाट करून शिवीगाळ केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी नमूद चारही आरोपींवर भादंविचे कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६, ३४, सहकलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला. चारही आरोपींना अटकदेखील करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पंडित करीत आहेत.
कार्ली विद्युत उपकेंद्र कार्यालयाची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:27 AM