यामध्ये निकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस पोषणमूल्याचा पूर्ण उपयोग करण्याकरिता चाऱ्यावर युरियाचे प्रक्रिया केल्यास निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता कशी वाढेल, यावर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील जनावरांसाठी शेतातील उत्पादित पिकांचा चारा म्हणून उपयोग केला जातो. उन्हाळ्यामुळे प्रामुख्याने पाण्याचा कमतरतेमुळे चारा घेणे अशक्य होते. या वेळेस गुरांना फक्त उत्पादित पिकांचा चारा म्हणून उपयोग होतो, तसेच या चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करून जनावरांसाठी चाऱ्यांची पौष्टिकता वाढविण्यास मदत होते आणि या प्रक्रियेमुळे गाई व म्हशीच्या दूध उत्पादन वाढीस मदत होते. याचा आरोग्यावर कुठलाही दुष्परिणाम होत नाही. यावेळी शेतकरी गोपाल देशमुख, विनोद डहाके, अरुण रत्नपारखी, सुधाकर पवार, रतन चव्हाण आदी शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय प्राचार्य डॉ.अतुल मुराई, प्रा.शशिकांत वाकुडकर, प्रा.डी.टी. बोरकर, मार्गदर्शक डाखोरे सर यांचे व इतर प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.
चाऱ्याची पौष्टिकतेसंदर्भात प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:46 AM