मानोरा : गेल्या पाच वर्षापासुन शेतकरी नापीकीच्या चक्रव्युहात अडकलेला असुन कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ असा नानाविध संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना निसर्गतर साथ देत नाहीच तर शासनाच्या प्रशासकीय धोरणही शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार चालुु केला आहे. याचे ज्वलंत उदाहरण मानोरा येथील स्थानिक भारतीय स्टेट बँकेने कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नवीन पिक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास देवुन अनावश्यक कागदपत्रांची मागणी करुन पिक कर्ज देण्यास टाळाटाळ चालली आहे. याबाबत शिवसेनेच्यावतिने बँकेसमोर ४ मे रोजी निदर्शने करण्यात आली.
यासंदर्भात यापूर्वी उपतालुका प्रमुख युवराज जाधव, शहर प्रमुख मनोहर राठोड, तालुका सचिव प्रा.ओम बलोदे, यांच्या नेतृत्वात वारंवार निवेदन, स्मरणपत्रे देवुनही जाचक अट शिथील करण्याची मागणी केली होती, परंतु निवेदनाची कोणतीही दखल घेण्यात न आल्याने ४ मे रोजी येथील स्टेट बँकेसमोर भव्य निदर्शने देवुनही अट शिथील करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलक उपतालुका प्रमुख युवराज जाधव, शहर प्रमुख मनोहर राठोड, तालुका सचिव प्रा.ओम बलोदे, डॉ.दिपक पाटील, करसडे, सुनिल जाधव, उपतालुका प्रमुख सर्कल प्रमुख नंदु पाटील चौधरी, वसंता राठोड, उपसर्कल प्रमुख राठोड, रोहीदास चव्हाण, ब्रम्हा जाधव, रमेश भोयर, गोपाल भोयर, विष्णु चव्हाण, माऊली राठोड, प्रविण चव्हाण, रमेश राठोड,संदीप चव्हाण, आदिंसह शेकडो शेतकऱ्यांनी या निदर्शनाचे वेळी उपस्थिती होती.आंदोलनात स्थानिक पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला होता. यावेळी आंदोलकांनी तहसीलदार व शाखा व्यवस्थापक यांना निवेदन देवुन या संवेदनशिल प्रश्नावर त्वरित दखल घेवुन मानोरा तालुक्यातील शेतकºयांना विनाअट विनाविलंब पिककर्जाचे वाटप करुन श्ेतकऱ्यांना बि बियाण्यांच्या खरेदीसाठी आवश्यक असणारा पैसा पिक कर्जाच्या माध्यमाने देवुन मदत करावी, स्टेट बँकेने नवीन धोरण आखत हजारो पिक कर्जमाफ झालेल्या श्ेतकऱ्यांना ४८०० रुपये भरावे लागत आहे तसेच खंडाळा, भुली व सोयजना येथील शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ होवुनही आता नवीन कर्ज देण्यास मानोरा स्टेट बँक टाळाटाळ करीत नाकारत आहे. एक प्रकारे हा त्यांच्यावर अन्याय असुन असे एक ना अनेक अफलातुन प्रकार मानोरा प्रकार अवलंबीत असुन या संपूर्ण बाबींचा तातडीने दखल घेवुन शेतकºयाना न्याय न दिल्यास शिवसेनेच्यावतीने यानंतरही उग्र स्वरुपाचे तीव्र आंदोलन छेडण्यात येतील असल्याचे सुध्दा निवेदनात नमुद केले आहे.