००००००००००
फळांचे दर (प्रति किलो)
ड्रॅगन फ्रुट २५०-३००
डाळिंब ८०
सफरचंद १२०
संत्रा ६०
मोसंबी १००
चिकू ६०
पपई ४०
पेरू ४०
००००००००००
खोकल्यामुळे पेरूची मागणी घटली
सध्या सर्दी, खोकल्याची साथ सुरू आहे. पेरूमुळे खोकला आणखी वाढण्याची भीती असल्याने पेरूची मागणी प्रचंड प्रमाणात घटली आहे.
पेरूचे भावही घटले आहेत. शहरातील काही फळ विक्रेत्यांकडेच पेरू उपलब्ध आहेत. बहुतांश विक्रेत्यांनी तर पेरू ठेवणेही बंद केले आहे.
०००००००००००००
डेंग्यूवर ड्रॅगनचा उतारा
डेंग्यू झाल्यावर रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. मात्र, किवी आणि ड्रॅगन फ्रुट ही फळे खाण्यामुळे प्लेटलेट्सही संख्या वाढते, डेंग्यू बरा होण्यास मदत होते, या फळांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची क्षमता सर्वाधिक आहे, असे सांगितले जात असल्याने, ड्रॅगन फ्रुटची मागणी वाढली आहे.
००००००००००
व्यापारी म्हणतात...
सध्या विविध फळांची मागणी वाढलेली आहे. मागणीच्या तुलनेत पुरेशा प्रमाणात पुरवठा नसल्याने सफरचंद, ड्रॅगन फ्रुट, किवी, मोसंबी आदी फळांच्या किमतीतही वाढ होत असल्याचे दिसून येते. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करणाऱ्या फळांना ग्राहकांची पसंती असल्याचे दिसून येते.
- गोपाल देशमुख, फळ विक्रेता, वाशिम.