कृषी सहायक विजयता सुर्वे यांनी सोयाबीनची पाहणी करून रोगनियंत्रणासाठी बुरशीनाशकाची फवारणी करण्यासह शुद्ध बियाण्यांसाठी भेसळयुक्त झाडे काढून टाकण्याचा सल्ला दिला. शिवाय ई-पीक पाहणीबाबत मार्गदर्शन करताना प्रत्येक शेतकऱ्याने पीक पाहणी ॲप प्रत्येक ॲण्ड्राईड मोबाईलमध्ये डाऊनलोड करून आपला पीकपेरा स्वत: नोंदवावा. जेणेकरून आपल्या पिकाचे नुकसान झाल्यास भरपाईसाठी आपण पुराव्यानिशी दावा करू शकतो.
एका मोबाईल नंबररून आपण स्वत:सह २० पेरेपत्रक भरू शकतो, असेही त्यांनी सांगितले. या शेती शाळेला कृषी सहायक ए. टी. ठोंबरे यांच्यासह आकाश देवळे, श्रीकृष्ण भगत, गोपाल देवळे व इतर शेतकरी उपस्थित होते.
...
फवारणीदरम्यान काळजी घ्या!
सोयाबीनसह इतर पिकांवर रोग नियंत्रणासाठी फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. फवारणी करताना अंगरक्षक कपडे, पायात बूट, हातमोजे, नाकातोंडावर मास्क, चष्मा आदी साधनांचा वापर करावा. शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी वारा शांत असताना फवारणी करावी, असेही विजयता सुर्वे यांनी सांगितले.