शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
2
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
7
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
12
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
13
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
14
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
15
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
16
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही
17
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
18
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
19
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
20
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?

मानोरा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिका-यांची वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 7:26 PM

ग्रामीण रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणा-या आरोग्य उपकेंद्रांत वैद्यकीय अधिका-यांची वाणवा जाणवत आहे. एकट्या मानोरा तालुक्यात १० वैद्यकीय अधिका-यांसह आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि परिचर मिळून ३० पदे रिक्त आहेत. त्यामुळे या तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे.

ठळक मुद्देग्रामीण रुग्णांची गैरसोयआरोग्य सेवक, सेविका,  परिचराची पदेही रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ग्रामीण रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणा-या आरोग्य उपकेंद्रांत वैद्यकीय अधिका-यांची वाणवा जाणवत आहे. एकट्या मानोरा तालुक्यात १० वैद्यकीय अधिका-यांसह आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि परिचर मिळून ३० पदे रिक्त आहेत. त्यामुळे या तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे.मानोरा तालुक्यात कुपटा, शेंदुरजना, पोहरादेवी येथे आरोग्य केंद्र आहेत. तर इतर अनेक ठिकाणी आरोग्य उपकेंद्र आहेत. या सर्व केंद्रांत ग्रामीण भागातील रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारी कर्मचा-यांची वाणवा आहे. त्यामुळे या ठिकाणी उपचारासाठी येणा-या रुग्णांची मोठी गैरसोय होत असून, रिक्त पदांमुळे संबंधित कार्यरत अधिकारी, कर्मचा-यांना गोरगरीब रुग्णांना योग्य आरोग्य सेवा देण्यात अनेक अडचणी येत आहेत. कोणत्याही आरोग्य केंद्रासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वैद्यकीय अधिका-यांची १० पदे मानोरा तालुक्यात रिक्त आहेत. त्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी पदाचाही समावेश असून, या पदाचा प्रभार शेंदुरजना येथील वैद्यकीय अधिकाºयांकडे दिला आहे. कुपटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन, पोहरादेवी येथील दोन, तसेच तालुका आरोग्य अधिकाºयांसह हतर सात वैद्यकीय अधिका-यांची येथे वाणवा आहे. त्याशिवाय कुपटा येथे दोन आरोग्य सेवक, दोन आरोग्य सेविका, दोन परिचराची पदे रिक्त आहेत.  शेंदुरजना येथे दोन परिचर, दोन आरोग्य सेवक आणि एक आरोग्य सेविकेचे पद रिक्त आहे. पोहरादेवी येथेही दोन वैद्यकीय अधिकारी, दोन आरोग्य सेवक, दोन परिचराची पदे रिक्त आहेत. अपुºया कर्मचाºयांमुळे कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचा-यांवर कामाचा मोठा ताण येत असून, ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यांत मोठा खर्च करावा लागत आहे. 

आरोग्य सेविकेचे पद सहा महिन्यांपासून रिक्त मानोरा तालुक्यातील हिवरा खु. येथे असलेल्या आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविके चे पद सहा महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे या आरोग्य उपकेंद्राला जोडण्यात आलेल्या आठ गावांतील गरोदर महिला, स्तनदा मातांसह इरत महिला रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. या ठिकाणी कंत्राटी तत्त्वावर एक आरोग्य सेविका नियुक्त करण्यात आली असली तरी, त्या केवळ लसीकरण शिबिर, पोलिओ लसीकरण अथवा इतर विशेष अभियानापुरत्याच या ठिकाणी भेट देत असल्याने त्याचा फारसा फायदा परिसरातील महिला रुग्णांना होत नाही. या ठिकाणी आरोग्य सेवकाचे पदही रिक्त असल्याने रुग्णांवर उपचार करणे कठीण होत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी कार्यरत आरोग्य सेविकेची बदली झाल्यानंतर हिवरा आरोग्य केंद्राची आवश्यकता लक्षात घेऊन प्रभारी आरोग्य अधिका-यांनी संबंधित आरोग्य सेविकेला दोन महिने कार्यमूक्त केले नव्हते; परंतु अखेर त्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार आरोग्य सेविकेला कार्यमूक्त करावे लागले. तथापि, त्या ठिकाणी दुसºया आरोग्य सेविकेची नियुक्ती मात्र करण्यात आली नाही.  

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर