लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : विभागीय आयुक्त पीयूष सिंह , जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्यासह तहसीलदार , गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील विविध मतदान केंद्रावर भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली .आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता तालुक्यात असणाº्या विविध मतदान केंद्रे विशेषत: जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळा येथील व्यवस्था पाहण्याकरिता विभागीय निवडणूक आयुक्त सिंह यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला . ज्या काही उणिवा आहेत त्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले . तसेच अजून काय सुधारणा करता येतील याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले . त्यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांना भेटी दिल्या. तालुक्यामध्ये जे संवेदनशील मतदान केंद्रे आहेत त्या ठिकाणीसुद्धा भेट देऊन आढावा घेतला . त्यावेळी त्यांच्यासोबत वाशिम जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, मालेगावचे तहसीलदार रवी काळे, मालेगाव चे गट विकास अधिकारी कुलदीप कांबळे, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिंद,े मालेगावचे तलाठी अमोल पांडे, नागरदासचे तलाठी डी.ए.राउत, मंडळ अधिकारी लोखंडे, नागरदासचे सरपंच महादेव देवळे यांच्यासह अनेक अधिकारी व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय निवडणूक आयुक्तांची विविध मतदान केंद्राना भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 6:01 PM