लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान मिळविण्यासाठी पात्र शेतकºयांना १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत आॅनलाईन स्वरूपातील अर्ज व घोषणापत्रे सादर करता येणार आहेत. ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी पात्र शेतकºयांनी लवकरात लवकर आपले आॅनलाईन अर्ज व घोषणापत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरूवारी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व जिल्ह्यांचा आढावा घेऊन आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याची सूचना केली आहे. वाशिम जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याची नि:शुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. याकरिता संबंधित पात्र शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज व घोषणापत्र १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ६०७ शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज व घोषणापत्रे प्राप्त झाली आहेत, अशी माहिती द्विवेदी यांनी दिली.मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या आढाव्यानुसार वाशिम जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांना आॅनलाईन अर्ज भरण्याची कार्यवाही गतिमान करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या, असेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले. आॅनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. वेबपोर्टलवरून शेतकरी स्वत: आपले आॅनलाईन अर्ज सादर करू शकतात. कर्जमाफी अथवा प्रोत्साहन अनुदानासाठी अर्ज सादर करताना यापूर्वी काही त्रुटी राहिल्या असल्यास त्यांची दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर आॅनलाईन अर्ज सादर करताना शेतकºयांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी जिल्हा उपनिबंधक आर. एन. कटके (८६५२१३१३०१), मारोती भेंडेकर (७४४७२३६५४५), महा ई-सेवा केंद्रांचे जिल्हा समन्वयक सागर भुतडा (९८५०३७१६७१), आपले सरकार सेवा केंद्रांचे जिल्हा व्यवस्थापक भगवंत कुलकर्णी (९०११७२३८५९) यांच्याशी संपर्क साधावा, असेही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले.
१५ सप्टेंबरपर्यंत भरता येणार कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 7:08 PM
वाशिम : राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान मिळविण्यासाठी पात्र शेतकºयांना १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत आॅनलाईन स्वरूपातील अर्ज व घोषणापत्रे सादर करता येणार आहेत. ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी पात्र शेतकºयांनी लवकरात लवकर आपले आॅनलाईन अर्ज व घोषणापत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरूवारी केले.
ठळक मुद्देअर्जांमध्ये राहिलेल्या त्रुटी दूर करण्याची सुविधा उपलब्ध मुख्यमंत्र्यांनी घेतला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यांचा आढावा