लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य परिवहन महामंडळाच्या निर्देशानुसार पंढरपूर यात्रेला जाणाºया भाविकांसाठी वाशिम जिल्ह्यातील चार आगार मिळून ८९ बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नियमित बसफेºयांची संख्या कमी होत असल्याने सर्वसाधारण प्रवाशांना त्रास होणार आहे. जिल्ह्यातील आगारांकडे बसगाड्यांची संख्या मर्यादित असल्याने आगारांनाही या संदर्भात नियोजन करण्याची मोठी कसरत करावी लागत आहे.महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपूर येथे जातात. या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य परिवहन महामंडळ विशेष बसफेºयांचे नियोजन करीत असते. यंदाही या बसफेºयांचे नियोजन करण्यात आले असून, यात वाशिम जिल्ह्यात वाशिम, मंगरुळपीर, कारंजा आणि रिसोड येथील आगारांतून पंढरपूर यात्रेसाठी ८९ बसफेºयांचे नियोजन करण्यात आले आहे. यात वाशिम येथील आगारातून ३५, रिसोड आगारातून २६, मंगरुळपीर आगारातून १४, तर कारंजा आगारातून १४ बसफेºयांचा समावेश आहे. या विशेष बसफेºया ८ जुलैपासून सुरू झाल्या आहेत. या बसफेºया सोडण्यात येत असताना इतर नियमित बसफेºयांची संख्या कमी होणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण प्रवाशांनाही अडचणी जाणार असून, महामंडळाच्या इतर उत्पन्नावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अशात बसफेºयांचे नियोजन करण्याची मोठी कसरत आगार व्यवस्थापकांना करावी लागणार आहे. सद्यस्थितीत मंगरुळपीर येथील आगारातून ३ नियमित बसफेºया कमी करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय वाशिम येथील आगारातील १५ नियमित बसफेºया कमी कराव्या लागणार आहेत. त्यामुळे विविध ंिठकाणी प्रवास करणाºया प्रवाशांसह लांबपल्ल्याचा प्रवास करणाºया प्रवाशांची पंचाईत होणार आहे. त्यामुळे महामंडळाचा उत्पन्नवाढीचा उद्देश असफल ठरणार असल्याने नियोजन करण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)विशेष बसफेऱ्यांत स्थानिक प्रवासी वाहतूकपंढरपूर यात्रेसाठी ज्या विशेष बसफेऱ्यां चे नियोजन आगारांच्यावतीने करण्यात आले आहे. त्या बसफेºयांत बरेचदा भाविकांची संख्या क्षमतेनुसार राहत नाही. त्यामुळे आसने खाली राहून महामंडळाला तोटा सहन करावा लागू शकतो, असे होऊ नये आणि इतरही स्थानिक प्रवाशांना प्रवास करता यावा म्हणून पंढरपूर यात्रेसाठी सोडण्यात येणाºया विशेष बसफेºयांत इतरही प्रवाशांना बसविता येईल, अशी माहिती मंगरुळपीर आगार व्यवस्थापक अकिल मिर्झा यांनी दिली.विभागीय नियंत्रकांच्या निर्देशानुसार पंढरपूर यात्रेसाठी १४ बसफेºया सोडण्यात येत आहेत. सद्यस्थितीत लांबपल्ल्याच्या तीन नियमित बसफेºया कमी केल्या असून, आणखी ३ बसफेºया कमी करण्यात येणार आहेत. बसगाड्यांची संख्या मर्यादित असून, भाविकांसह इतर प्रवाशांचीही गैरसोय टाळण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. -अकिल मिर्झा- आगार व्यवस्थापक, मंगरुळपीर
वाशिम आगारातून पंढरपूर यात्रेसाठी ३५ बसफेºयांचे नियोजन असून, या बसफेºया सुरुही झाल्या आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून नियमित १५ बसफे ºया कमी कराव्या लागणार आहेत. आता इतर प्रवाशांचीही गैरसोय होऊ नये म्हणून बसफेºयांचे वेळेनुसार नियोजन करण्यात येत आहे.-विनोद इलामे, आगार व्यवस्थापक, वाशिम