वाशिम : वंचित बहुजन आघाडीचे सुप्रिमो ळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने २१ जून रोजी केंद्र व राज्य सरकार यांच्या वाढत्या महागाईच्या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीवाशिम जिल्हा यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र धरणे आंदोलन छेडण्यात आले. सकाळी ११ ते ४ या दरम्यान जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मिळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आली. लोकशाही मार्गाने नियमाचे पालन करून राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.महागाइ वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाविरूद्ध रोष व्यक्त करण्यात आला. या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख, जिल्हा महासचिव सिद्धार्थ देवरे, शहराध्यक्ष अनिल घोले, सल्लागार दत्तराव गोटे, प्राध्यापक सुभाष अंभोरे, सचिव दिलीप भगत, जिल्हा परिषद सदस्य कल्पना राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य चरण गोटे, उपजिल्हा अध्यक्ष हिवराळे, तालुका अध्यक्ष नारायण खोडके, मिलिंद उईके, मिलिंद भगत इत्यादी पदाधिकारी हजर होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 5:25 PM