शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

डीएससीअभावी ग्रामपंचायती निधीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 12:20 PM

Gram panchayat News : कोट्यवधी रुपयांचा  निधी अडकून पडल्याने ग्रामपंचायती हैराण झाल्या आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव  : पंधराव्या वित्त आयोगाचा  कोट्यवधी रुपयांच्या आसपास निधी केंद्राकडून राज्याला मिळाला असला, तरी संगणकीय स्वाक्षरीचे प्रमाणपत्र (डीएससी)अभावी  ग्रामपंचायती निधीपासून वंचित आहेत. तांत्रिक गोंधळामुळे  कोट्यवधी रुपयांचा  निधी अडकून पडल्याने ग्रामपंचायती हैराण झाल्या आहेत. ग्रामपंचायतींना गावांच्या विकासासाठी वित्त आयोगाकडून निधी मिळतो. अर्थात, हा निधी देताना ‘पीएफएमएस’ या सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणालीचा वापर करण्याची अट केंद्राने टाकली आहे. यामुळे निधीचा परस्पर वापर  करण्यास चाप लावण्यात आला आहे. या प्रणालीचा वापर करताना ग्रामपंचायतीने एक रुपया खर्च केला तरी त्याचा तपशील तत्काळ संगणकाद्वारे केंद्राला बघता येतो. यात ‘पीएफएमएस’ प्रणालीशी ग्रामपंचायतीमधील जबाबदार व्यक्तींची नावे जोडावी लागतात. त्यासाठी आधी डीएससी (संगणकीय स्वाक्षरीचे प्रमाणपत्र) तयार करावे लागते. ही बाब राज्याच्या ग्रामपंचायत विभागाने पुढाकार घेऊन पूर्ण  केली आहे. ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक व सरपंचांचे ‘डीएससी’ तपशील या प्रणालीवर अपलोड करायचे आहे. हे  काम रखडलेले होते. त्यामुळे ग्रामपंचायतींना निधी मिळालेला नाही.  तो परत जाण्याच्या मार्गावर असताना  ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. ग्रामपंचायत विभागाशी संबंधित यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, डीसीएस प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुंबईत स्वतंत्र यंत्रणा देण्यात आली आहे. यात जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी  आगोदरच या यंत्रणेच्या संपर्कात राहून ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायला हवी. पंचायत समित्यांमधील लेखा अधिकारी व जिल्हा परिषदांमधील मुख्य लेखा व वित अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असता तर हा गोंधळ झाला नसता, असा सूर ग्रामपंचातींमधून उमटत आहे.

 संगणकीय स्वाक्षरीचे प्रमाणपत्र (डीएससी)चे काम सुरू आहे. येत्या ८ दिवसात हे काम पूर्ण करण्यात येईल.- श्रीनिवास पदमानवार गटविकास अधिकारी मालेगाव

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत