सुनील काकडे / वाशिमपावसाचा खंड व टंचाईग्रस्त परिस्थितीत शेतकर्यांच्या पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी मागेल त्या शेतकर्याला शेततळे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता; मात्र या योजनेंतर्गत शेततळे तयार करण्यासाठी मिळणारे तुटपूंजे अनुदान, शेततळे मंजुरीची किचकट प्रक्रिया यांसह इतर तांत्रिक अडचणींमुळे या योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे.जिल्ह्यासाठी १ हजार ८९२ शेततळ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेल्या ह्यमागेल त्याला शेततळेह्ण, या योजनेसाठी ३१ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील १ हजार ७४६ शेतकर्यांनी शेततळे मिळण्यासाठी ह्यऑनलाइनह्ण अर्ज सादर केले होते. त्यापोटी शासनाकडून साडेपाच कोटी रुपयांचा निधीही वितरित करण्यात आला; मात्र ज्याठिकाणी शेततळे द्यायचे आहे, त्या स्थळाचे निरीक्षण करण्यासाठी कृषी विभागाचा कर्मचारी, लघू सिंचन, जलसंपदाचा कर्मचारी आणि संबंधित शेतकर्याने सोबत राहून स्थळनिश्चित करण्याची किचकट प्रक्रिया ह्यमागेल त्याला शेततळेह्ण, या योजनेच्या अंमलबजावणीत प्रमुख अडथळा ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय शेतकर्यांच्या दृष्टिकोणातून इतरही अनेक किचकट समस्यांमुळे ही योजना बहुतांशी अपयशी ठरल्याचे चित्र आहे. कृषी विभागाचे दुर्लक्षित धोरण यासाठी कारणीभूत मानले जात आहे.१४३ कामांना कार्यारंभ आदेश; १७ पूर्णह्यमागेल त्याला शेततळेह्ण, या योजनेंतर्गत १ हजार ७४६ शेतकर्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले. त्यापैकी १४३ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले असून, केवळ २७ कामे सुरू करण्यात आली. त्यातही १0 कामांना अद्याप प्रारंभच झाला नसून, १७ कामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी दिली. तथापि, आता पावसाळ्याला प्रारंभ झाल्यामुळे उर्वरित कामे ठप्प झाली असून, आगामी चार महिने कुठलेही काम शक्य नसल्याची स्थिती आहे.
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा बोजवारा!
By admin | Published: July 01, 2016 1:17 AM