जिल्ह्यातील जनतेला जातपडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी पूर्वी अकोला येथे जावे लागत होते. यामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता चार वर्षांपूर्वी वाशिम येथेच स्वतंत्र जातपडताळणी समितीचे कार्यालय स्थापित करण्यात आले. या ठिकाणी उपआयुक्त आणि दक्षता पथकाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मिळून २० जण कार्यरत आहेत. तथापि, जातपडताळणीच्या प्रस्तावातील विविध कागदपत्रांची छाननी, पावती देण्यासह ऑनलाइन प्रस्तावांची पडताळणी करून तो प्रस्ताव समितीकडे सादर करण्यास हे मनुष्यबळ अपुरे पडते. शिवाय, नेट कनेक्टिव्हिटीचा खोडाही असल्याने जातपडताळणीला विलंब होत आहे.
------------
केवळ २० जण कार्यरत
वाशिम येथील जातपडताळणी समिती कार्यालयाच्या स्थापनेनंतर या कार्यालयासाठी सहआयुक्त आणि उपायुक्तांसह इतर कर्मचाऱ्यांच्या पदस्थापनाही करण्यात आल्या; परंतु आज रोजी केवळ २० कर्मचारी असतानाच उपआयुक्तांकडे दोन जिल्ह्यांचा प्रभार आहे.
-------
कोट : जातपडताळणी प्रमाणपत्राचे प्रस्ताव रखडले जाऊ नयेत म्हणून उपलब्ध मनुष्यबळाचा प्रभावी वापर व नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जात आहे. काही वेळा इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा खोडा निर्माण होतो. तथापि, विद्यार्थी, कर्मचारी किंवा उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून नियमानुसार वेळेतच प्रकरणे निकाली काढली जातात.
- लक्ष्मण राऊत, जातपडताळणी समिती अध्यक्ष, वाशिम
---------
कोट : विद्यार्थ्यांना वेळेत जातपडताळणी प्रमाणपत्र मिळाले नाही, तर मोठे नुकसान होऊन शैक्षणिक भवितव्य अडचणीत येऊ शकते. वाशिम येथील जातपडताळणी समिती कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभते. तथापि, अपुरे कर्मचारी आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा खोडा वारंवार येत असल्याने प्रकरणाला विलंब लागतो.
-अजय बावणकसे, विद्यार्थी
---------
एका प्रकरणासाठी ३ तासांचा वेळ
वाशिम जिल्हा जातपडताळणी समितीकडे प्रमाणपत्रासाठी दाखल झालेल्या प्रस्तावांची तपासणी करण्यासह दक्षता पथकाकडे चौकशीकडून आलेल्या प्रस्तावाची पडताळणी करून तो प्रस्ताव निकाली काढण्यासाठी जवळपास ३ तासांचा वेळ लागतो.
--------
समितीकडे दाखल प्रकरणे
५० रोज दाखल होणारी प्रकरणे
------
१३९० एका महिन्यात दाखल झालेली प्रकरणे
------
४० रोज निकाली निघणारी प्रकरणे
--------------
९०१ प्रलंबित असलेली प्रकरणे
-----------