यशवंत हिवराळे । लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा (जि.वाशिम) : विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुर वारीत गेलेल्या पुष्पाबाईची वाट हरवली. त्यानंतर सतत तीन दिवस उपाशी पोटी वणवण भटकंती करावी लागली; मात्र औरंगाबाद येथे दिव्यांग शेख करीमच्या रुपाने साक्षात देवदूत भेटल्याने त्या सुखरुप घरी पोहोचलेल्या.मालेगाव तालुक्यातील मौजे राजुरा येथील पुष्पाबाई बळीराम सानप ही (४५) २ जुलै रोजी एका खासगी ट्रॅव्हल्सने पंढरपुर वारीसाठी गेली हो ती. मात्र पंढरपुरात पुष्पाबाईची लाखोंच्या गर्दीत संवगड्यासोबत ३ जुलै रोजी चुकाभूल झाली. दिवसभर पंढरीत संवगड्याचा शोध घेणार्या पुष् पाबाईच्या पदरी निराशा पडली. सर्वच परिसर अपरिचित असल्यामुळे शेवटी त्यांनी बसस्थानकाचा आधार शोधला. तेथून त्या नगरला पोहोचल्या. नगरच्या बसस्थानकावर रात्र काढलेल्या पुष्पाबाईला प्रवाशांनी औरंगाबादला जाण्याचा सल्ला दिला. त्या औरंगाबादला आल्या तो पर्यंंत जवळचा पैसा संपला होता. खीन्नवस्थेत उभ्या असलेल्या पुष्पाबाईची काही प्रवाशांनी विचारपुस केली असता पुष् पाबाईनी आपबिती कथन करुन मालेगावला जायचे असे सागताच प्रवाशांनी एका बसमध्ये बसवून दिले. बस मार्गस्थ झाली. औरंगाबाद श्हरापासून काही किमी अंतरावर पोहोचली असता बस वाहकाने तिकीटाची विचारणा करताच मला वाशिम -मालेगावला जायचं असे सांगितले. मात्र पुष्पाबाईचे दुदैव येथे आड आली ती बस वाशिम मालेगाव नसून धुळे-मालेगाव असल्याचे वाहकाने सांगून एका पेट्रोल पंपावर पुष्पाबाईना उतरवुन दिले. असंख्य प्रश्नाचे काहूर डोक्यात घुसलेल्या पुष्पाबाई मोठमोठय़ाने रडायला लागल्या. त्याच क्षणी रोजी रोटीच्या शोधात गवंडी कामावर जात असलेल्या व एका हाताने दिव्यांग असलेल्या पेडगाव जि.औरंगाबाद येथील शेख चाँद शेख करीम वय ५0 वर्षे या मुस्लीम युवकाचे पुष्पाबाईची आपबिती ऐकुण हृदय हेलावले. आस्थेने त्यांनी पुष्पाबाईची विचारपुस केली. चांदभाईनी औरंगाबाद बसस्थानकाची पुष्पाबाईला घेवुन वाट धरली. औरंगाबाद वाशिम बसमध्ये मालेगावकडे येत असतानाआणखी एका संकटाला पुष्पाबाईंना सामोर जावे लागलं. रस्त्यावरुन धावणार्या एका सायकल स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचा अपघात झाला. यामध्ये काही प्रवाशी जखमी होऊन पुष्पाबाईच्या डोक्याला मार लागला. वाटेत दवाखाना करुन बस मार्गस्थ झाली. गुरुवार ६ जुलै रोजी रात्री सायंकाळदरम्यान शे.चांदभाई पुष्पाबाईंना घेऊन राजुरा येथे पोहोचले.त्यापुर्वी पुष्पाबाई हरविल्याची वार्ता संपूर्ण गावभर पसरली होती. घटना समजताच त्यांचा मोठा मुलगा गणेश पंढरपुरात दोन दिवसापूर्वीच दाखल झाला होता. शोधोशोध करुनही पुष्पाबाईचा मुलगा गणेशला थांगपत्ता लागला नव्हता. अखेर पोलिसात तक्रारही दाखल केली. मात्र ६ जुलैला रात्री ७ वाजता कोणतीही कल्पना नसताना शे.चांदभाई पुष् पाबाईला घेवुन दारावर दाखल झालेले बघताच नातेवाईकांच्या मायेचा बांध फुटला. मुस्लीम सदग्रहस्थाने दाखवलेल्या आपुलकीने तो देवदूत भेटला असल्याचे मत गावकर्यांनी व्यक्त केले.
वाट चुकलेल्या ‘पुष्पा’साठी दिव्यांग ‘चाँद’ ठरला देवदुत!
By admin | Published: July 09, 2017 9:42 AM