-----------
वाहनाच्या धक्क्याने घुबडाचा मृत्यू
उंबर्डा बाजार: अज्ञात वाहनाचा जोरदार धक्का लागल्याने महाकाय आकाराच्या घुबड पक्ष्याचा मृत्यू झाल्याची घटना ८ जानेवारी रोजी सकाळी कारंजा ते दारव्हा मार्गावरीवरील पिंप्री फॉरेस्ट फाट्यानजीक उघडकीस आली. घुबड हा निशाचर पक्षी असल्याने सहसा दिवसा दिसून येत नाही. दाट झाडी, पडक्या विहिरी, पडकी घरे आदी ठिकाणी या पक्षाचा अधिवास दिसून येतो.
--
गायवळ प्रकल्पात उरला ५० टक्के साठा
कामरगाव: गतवर्षी कारंजा तालुक्यात दमदार पाऊस पडल्याने बहुतांश प्रकल्पांची पातळी १०० टक्के झाली. त्यात गायवळ येथील प्रकल्पाचाही समावेश होता; परंतु या प्रकल्पाची खोली कमी असतानाच सिंचनासाठी होत असलेल्या उपशामुळे या प्रकल्पात उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच केवळ ५० टक्के उपयुक्त जलसाठा उरला आहे. त्यामुळे प्रकल्पाची खोली वाढविणे आवश्यक आहे.
-----------
घरकुल लाभार्थींना निधीची प्रतीक्षा
तळप बु. : मानोरा पं.स. अंतर्गत येत असलेल्या ग्रा.पं. तळप बु. येथील अनुसूचित जातीमधील नऊ लाभार्थींना रमाई घरकुल योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले; परंतु वर्ष उलटून गेले तरी या लाभार्थींच्या खात्यात घरकुल अनुदानाचा निधी जमा करण्यात आला नाही. शासनाकडून निधी प्राप्त होताच लाभार्थीच्या खात्यात टाकण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक सोनटक्के यांनी सांगितले.
------
विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतनास विलंब
वाशिम : विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतन अनुदानाकरिता ३५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तथापि, जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळांतील बहुतांश शिक्षकांना वेतन मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत असल्याने प्रशासनाने वेतन नियमित अदा करावे, अशी मागणी त्यांच्याकडून शुक्रवारी करण्यात आली.
===Photopath===
090121\09wsm_4_09012021_35.jpg
===Caption===
उमरवाडी, कोळदºयात विकास आराखडा बैठक