राजकीय केंद्रस्थान व जिल्ह्यात सर्वात मोठी अन् प्रतिष्ठेची असलेल्या शेलूबाजार ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षाची चढाओढ सुरू आहे. गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीच्या आघाडीने सदर ग्राम पंचायत विराेधकांना एकही जागा मिळवू न देता ताब्यात घेतली होती. त्याच यशाच्या जोरावर व त्यांनी केलेल्या विकास कामामुळे पुन्हा एकदा जनतेच्या जोरावर युवा ग्रामविकास आघाडी स्थापन करुन निवडणुकीत उतरली आहे. या निवडणुकीमध्ये वाॅर्ड क्रं. १ मधून महावीर तोडरवाल, सौ. प्रमिला पवार, श्रीमती इंदुबाई पानभरे, वाॅर्ड क्रं. २ मध्ये सौ. संपदा राऊत, असलम शहा, वाॅर्ड क्रं. ३ मध्ये सुनील हरणे, सौ. शुभांगी अरबाड, वाॅर्ड क्रं. ४ मध्ये सदानंद चक्रनारायण, किशोर गाडगे, शाहीस्ताबी खान व वाॅर्ड क्रं. ५ मध्ये जयकुमार गुप्ता, सौ. मंदा लांभाडे, व सौ. मीरा परसे यांचा समावेश् आहे. या उमेदवारांनी गेल्या चार ते पाच दिवसात केलेल्या प्रचारामुळे विजयाच्या दिशेने वाटचाल केल्याचा दावा सुनीता पांडुरंग काेठाळे केला आहे. यामध्ये पॅनलला विशेष सहकार्य करणारे प्रकाश अग्रवाल, माजी उपसरपंच दत्ताभाऊ भेराणे, डॉ. यावर शहा, माजी उपसरपंच हिदायत शहा, बब्बू शहा, देवीचंद तोडरवाल, रमेश पवार, कृष्णप्रसार गुप्ता, अजय अग्रवाल, घनशामदास झंवर, भागवत लांभाडे, गोपाल पानभरे, गोविंदा भेराणे, फारुख खान, ही मंडळी जीवाचे रान करून उमेदवाराला विजयाकडे नेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. युवा ग्राम विकास आघाडीच्यावतीने १३ जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी महिला, पुरुष मतदारांच्या उपस्थितीमुळे पुन्हा सत्ता काबीज करण्याची शक्यता काेठाळे यांनी वर्तविली आहे. (वा.प्र.)
विकास कामामुळे पुन्हा एकदा जनतेच्या जोरावर युवा ग्रामविकास आघाडी स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:34 AM