लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पो. स्टे.: नवसाला पावणारा महादेव म्हणून ओळख असलेल्या आसेगाव येथील जागेश्वर संस्थांवर भाविकांची मांदियाळी दिसत आहे. श्रावणातील पहिल्याच सोमवारी दर्शनासाठी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांची गर्दी उसळली होती. श्रावणमासानिमित्त या संस्थानवर महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. आसेगावनजिक जागेश्वराचे म्हणजेच महादेवाचे अति प्राचीन मंदिर आहे. आसेगापासून काही अंतरावर उंच टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिरावर चिंच, औदूंबर तसेच सीताफळाची झाडे आहेत. अतिशय रमणीय आणि मोहक असा मंदिर परिसर आहे. श्रावणमासानिमित्त विविध ठिकाणचे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. यंदाच्या श्रावणमासाला सुरुवात झाल्यानंतर १३ आॅगस्ट रोजी पहिल्याच सोमवारी विविध ठिकाणचे शेकडो भाविक या संस्थानवर दर्शनासाठी सकाळपासूनच दाखल झाले होते. सकाळच्या सुमारास शेकडो शिवभक्तांनी मंदिरातील शिवलिंगांवर बेलपाने वाहून पुजा केली. या मंदिरावर श्रावणमासात पंचक्रोशीतील शिवणी, पिंपळगाव,नांदगाव चिंचखेड, चिंचोली, कुंभी, सार्सीसह जिल्हाभरातील शिवभक्त शिवलिंगांवर बेलपाने वाहण्यासाठी येतात.
श्रावणमासानिमित्त आसेगावच्या जागेश्वर संस्थानमध्ये भाविकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 3:35 PM
आसेगाव पो. स्टे.: नवसाला पावणारा महादेव म्हणून ओळख असलेल्या आसेगाव येथील जागेश्वर संस्थांवर भाविकांची मांदियाळी दिसत आहे.
ठळक मुद्देआसेगापासून काही अंतरावर उंच टेकडीवर हे मंदिर आहे.पहिल्याच सोमवारी विविध ठिकाणचे शेकडो भाविक या संस्थानवर दर्शनासाठी सकाळपासूनच दाखल झाले होते. श्रावणमासानिमित्त विविध ठिकाणचे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.