लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : धार्मिक कार्यक्रमात नेहमी अग्रेसर असलेले वाशिम शहरातील वाटाणे परिवाराच्यावतिने सामूहिक विजय ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक पारायण सोहळयामध्ये ७४० भाविक सहभागी होऊन त्यांनी पारायण केले. विशेष म्हणजे यावेळी ज्यांच्याकडे ग्रंथ नाहीत अशांना ग्रंथ सुध्दा उपलब्ध करुन देण्याचे कार्य वाटाणे परिवाराच्यावतिने करण्यात आले.१८ डिसेंबररपासून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाचा समारोप २० डिसेंबर रोजी महाप्रसादाने करण्यात आला. यावेळी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे या पारायण सोहळयामध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. विशेषत बाहेरगावाहून आलेल्या भाविकांसाठी भोजनाची व्यवस्थाही वाटाणे परिवाराच्यावतिने करण्यासत आली होती. या तीन दिवसीय कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. आळंदी येथील प्रवीण महाराज काळे यांनी या पारायणाचे नेतृत्व केले. मागील तीन दिवस, सकाळी नऊ ते अकरा आणि दुपारी तीन ते पाच या वेळेत पारायण झाले. दररोज सायंकाळी हरिपाठही झाला. मनोहर महाराज कोठेकर आणि शंकर महाराज इंगोले यांनी सुरेल गायन केले. तामसी येथील गजानन महाराजांनी मृदंगावर साथ केली. शुक्रवारी रात्री विजय महाराज गवळी यांचे कीर्तन झाले, तर २० डिसेंबर रोजी सकाळी सिताराम महाराज खानझोडे यांचे काल्याचे कीर्तन झाले. महाप्रसादाने पारायणाची सांगता झाली. उपस्थित हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कोठा येथील चिमुकले वारकरी ठरले लक्षवेधी! गुरुवारी रात्री झालेले विजय महाराज गवळी यांचे कीर्तन भाविकांसाठी पर्वणी ठरले. गायनाचार्य मनोहर महाराज यांनी तसेच मंगेश महाराजांनी त्यांना मृदंगावर साथ केली. विशेष म्हणजे कोठा येथील हरी बापू वारकरी शिक्षण संस्थेचे ५० विद्यार्थ्यांचे वारकरी मंडळही या कीर्तनाला उपस्थित होते. त्यांनी भाविकांचे लक्ष वेधले होते. विशेष म्हणजे तामसी नजीकच्या आश्रमातील श्याम बाबा, रतनगड येथील गोपाल महाराज, वडपचे चैतन्य बाबा, आसेगाव येथील आश्रमाचे योगीनाथ पुरी महाराज, येवता येथील शांती पुरी महाराज यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमासाठी श्रीकृष्णराव वाटाणे, दिनकरराव वाटाणे, वसंतराव वाटाणे, मुख्याध्यापक वीरेंद्र वाटाणे, शिवाजीराव वाटाणे, नगर परिषद सभापती अतुल वाटाणे आदींनी पुढाकार घेतला. पंढरपूर येथे जाणाºया पालख्यांचे स्वागत करुन त्यांना अन्नदान करणाºया दिनकरराव वाटाणे यांनी गत काही वर्षांपासून सामूहिक ग्रंथ पारायण सोहळयाचे आयोजन करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला १०१ भाविकांपासून सुरु झालेल्या या उपक्रमास आज शेकडो भाविक सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे ज्या भाविकांकडे ग्रंथ नाहीत अशांना मोफत ग्रंथ देऊन त्यामध्ये सहभागी करुन घेतल्या जाते. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
७४० भाविकांचे सामूहिक विजय ग्रंथ पारायण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 3:37 PM