लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील १६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा ज्वर सध्या ग्रामीण भागात चांगलाच चढला असून, ३ हजार २२६ उमेदवार सध्या प्रचारात व्यस्त असल्याचे चित्र आहे. दरम्यान, प्रचारासाठी उमेदवारांकडे केवळ एकच दिवस उरला असला तरी दरराेज रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हाॅटेल, ढाब्यांवर पार्ट्या हाेत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ढाब्यांवर पाेलिसांकडून कारवाईही करण्यात आली. तरीसुद्धा छुप्या मार्गाने ढाबे रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे दिसून येत आहे. १३ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे उपलब्ध वेळेचा उमेदवार पुरेपूर वापर करून प्रचारावर भर देत आहेत. याकरिता कार्यकर्त्यांची माेठी फाैज उमेदवारांना साेबत लागत आहे. त्यांना खूश ठेवण्यासाठी दिवसभर प्रचार, भेटीगाठीनंतर ढाब्यांवर दारू, जेवणाळ्या उठताना दिसून येत आहे. वाशिम जिल्ह्यात १,४८७ उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. प्रत्यक्षात या १,४८७ जागांसाठी तीन हजार ३,२२६ उमेदवार निवडणूक रिंगणात भाग्य आजमावत आहेत. काही ठिकाणी माेठ्या प्रमाणात युवक रिंगणात उतरलेले दिसून येत आहे. दरम्यान, आठ दिवसांआधी जिल्हा पाेलीस अधीक्षकांनी रात्री उशिरा सुरू असलेल्या ढाब्यांवर कारवाई केली हाेती. १३ जानेवारी राेजी प्रचार थांबणार असल्याने १२ जानेवारी व १३ जानेवारी राेजी कार्यकर्ते साेबत राहावेत यासाठी त्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे.
कार्यकर्त्यांची चंगळ जिल्ह्यातील निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. निवडणूक शांततेत पार पडावी याकरिता नागरिकांनीसुद्धा सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणूक हाेत असलेल्या गावातील कार्यकर्त्यांची चांगलीच चंगळ हाेत आहे. ओल्या पार्ट्यांमध्ये कार्यकर्ते मग्न असून रात्री उशिरापर्यंत पार्ट्या हाेत असताना दिसून येत आहे.