ठळक मुद्देयामुळे दीड ते दोन तास वाहतूकीचा पुरता खोळंबा झाला होता. इतर ठिकाणीही धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार (वाशिम) : धनगर समाजाला शासनाने तत्काळ आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी समाजबांधवांनी नागपूर-औरंगाबाद महामार्गावर सोमवार, १३ आॅगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे दीड ते दोन तास वाहतूकीचा पुरता खोळंबा झाला होता. धनगर समाज संघर्ष समितीच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात शेलुबाजार, वनोजा, पेडगाव, गोगरी, कंझरी, पार्डी ताड, पिंप्री खुर्द येथील धनगर समाजबांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यामुळे नागपूर-औरंगाबाद दृतगती मार्ग व अकोला-मंगरूळपीर मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. यासह जिल्ह्यातील इतर ठिकाणीही धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.