नंदकिशोर नारे
वाशिम : हाॅटेल आणि रेस्टाॅरंट आता रात्री दहापर्यंत उघडे राहण्यास सुरुवात झाली आहे. परंतु हाॅटेलमधील प्रत्येक कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असावे, अशी अट असताना लाेकमतने केलेल्या पाहणीवरून अनेकांचे लसीकरणच झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. असे असले तरी प्रशासनाकडून केवळ अट घालण्यात आली, परंतु ज्यांनी लसीकरण केले नाही त्यासंदर्भात काेणतेच पाऊल उचलल्याचे शहरातील हाॅटेल्स, रेस्टाॅरंटमध्ये पाहणी केली असता दिसून आले.
हाॅटेलमध्ये अनेक १८ वर्षांखालील असल्याने आम्हाला लस घेता आली नसल्याचे अनेकांनी यावेळी सांगितले आहे.
----
काहींचे लसीकरण पूर्ण, काहींचे बाकी!
वाशिम ते अकाेला रस्त्यावरील एका हाॅटेल, रेस्टाॅरंटमध्ये भेट दिली असता येथील मालकाचे व स्वयंपाक्यासह दाेन कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेत, परंतु उर्वरित ४ कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली नाही.
वाशिम शहरातील पुसद नाका परिसरातील हाॅटेलमध्ये काही १८ वर्षांखालील कर्मचारी दिसून आल्याने आम्हाला लसीकरण करता आले नसल्याचे सांगण्यात आले.
----
रस्त्यांवर टपऱ्यांवर आनंदी आनंद
शहरातील पाटणी चाैक ते आंबेडकर चाैक, पाेलीस स्टेशन चाैक, पुसद नाका, लाखाळा परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या नाश्ता सेंटर, चहा टपऱ्यावरील अनेकांनी लसीकरण केले नसल्याची बाब उघडकीस आली आहे. चर्चेदरम्यान लसीबाबत त्यांच्यात गैरसमज दिसून आले.
----
लसीकरण करून घेण्याच्या दिल्या सूचना
शहरातील काही हाॅटेलला भेटी दिल्यानंतर तेथे अनेक जण लसीकरण केलेले आढळून न आल्याने हाॅटेल मालकांशी चर्चा केली असता सर्वांचे लसीकरण करण्यात येणार असून सर्वांना तशा सूचना दिल्याचे सांगितले
----
नियमानुसार हाॅटेल व्यावसायिकांसह कर्मचाऱ्यांना लसीकरण करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी आदेशात देण्यात आल्या आहेत. त्यानंतरही आदेशाचे उल्लंघन हाेत असल्यास अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करू
-शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम
----
शहरातील हॉटेल्स १९०
सध्या सुरू झालेल्या हॉटेल्स १२०
हॉटेल कर्मचाऱ्यांची संख्या ६००