देशभरात ५ ऑगस्ट २००६ पासून अन्नसुरक्षा आणि मानके कायदा लागू करण्यात आला. त्यातील कलम ५० अन्वये विक्री केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा योग्य नसल्यास पाच लाख, कमी दर्जाच्या अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री केल्यास पाच लाख आणि खोटी जाहिरात दिल्यास १० लाखांपर्यंत दंड होऊ शकतो; मात्र मुळातच मनुष्यबळ अगदीच कमी असल्याने अन्नपदार्थ नमुने तपासण्याचे प्रमाणही तुलनेने अत्यल्प आहे. त्यामुळे भेसळखोरांचे फावत असल्याचे दिसून येत आहे.
..................
१) भेसळ किती?
२०२० घेतलेले नमुने भेसळ
९०/२
जानेवारी २०२१ - ५/२
फेब्रुवारी - ५/०
मार्च - ९/३
एप्रिल - ४/०
मे - ८/१
जून - १०/१
जुलै - ७/०
ऑगस्ट - २/०
........................
कोरोनाकाळात २६ हजारांचा दंड वसूल
जिल्ह्यात कार्यरत अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून कोरोनाकाळात २०२० मध्ये ९० आणि २०२१ मध्ये आतापर्यंत ५० असे एकूण १४० खाद्यपदार्थ नमुने तपासण्यात आले. त्यातील ९ नमुने कमी दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून संबंधितांना २६ हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
..............
खरेदी करताना घ्या काळजी
श्रावण महिन्यापासून महत्त्वाच्या सणासुदींना सुरुवात होते. यादरम्यान तेल, दूध, दुग्धजन्य पदार्थ, पीठ, साखर, तूप यासारख्या खाद्यपदार्थांच्या विक्रीत अचानक वाढ होते. ही संधी हेरून काहीजण खाद्यपदार्थांत भेसळ करतात. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
.............
सणासुदीच्या काळात वाढते तपासणीचा वेग
सणासुदीच्या काळात हाॅटेल्समध्ये मिळणाऱ्या विविध स्वरूपातील आयत्या खाद्यपदार्थांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होण्याचा प्रकारही वाढीस लागतो. तो रोखण्यासाठी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून या काळात तपासणीला विशेष वेग दिला जातो.
..............
कोट :
वाशिम जिल्ह्यात दोन अन्नसुरक्षा अधिकारी कार्यरत होते. त्यापैकी एकाची आठ दिवसांपूर्वी बदली झाली आहे. कोरोनाकाळात जिल्ह्यात एकूण १४० खाद्यपदार्थ नमुने तपासण्यात आले. त्यातील ९ नमुने कमी दर्जाचे आढळले. संबंधितांना दंड ठोठावण्यात आला आहे.
- नीलेश ताथोड, अन्नसुरक्षा अधिकारी, कारंजा