शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्यात तफावत; नागरिक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 7:28 PM

Corona Cases : आरोग्य विभागातील आकड्यांच्या या खेळात सर्वसामान्यांचाच ‘खेळ’ होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

-   शंकर वाघशिरपूर जैन : शिरपूर जैन येथे १८ मे रोजी करण्यात आलेल्या चाचणीमधील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्यवर्धिनी केंद्रातील माहितीमध्ये तफावत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आरोग्य विभागातील आकड्यांच्या या खेळात सर्वसामान्यांचाच ‘खेळ’ होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मे महिन्यात ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शासनासह प्रशासनही अलर्ट झाले आहे. ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत असून, याला नागरिकांचा प्रतिसादही मिळत आहे. १८ मे रोजी शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये एकुण ४९ नागरीकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. चाचणी करण्यात आलेल्या एकूण ४९ नागरिकांपैकी २३ नागरीक हे शिरपूर जैन येथील रहिवासी आहेत. त्यापैकी सात जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रातून देण्यात आली. तालुका आरोग्य अधिकाºयांतर्फे बालु गवई यांनी दिलेल्या माहितीनुसार ४९ चाचण्यांपैकी चार जण पॉझिटिव्ह आले. शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्र व मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावतीने दिलेल्या माहितीत तफावत असल्याचे समोर आले. १८ मे रोजी शिरपूर येथे नेमके किती जण पॉझिटिव्ह आले? असा प्रश्न निर्माण होत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्यातील ही तफावत नागरिकांची चिंता वाढविणारी ठरत आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता, फोनवर बोलता येणार नाही, प्रत्यक्ष भेटून सांगता येईल असे त्यांनी सांगितले. शिरपूर स्थानिक व संपूर्ण केंद्रांतर्गत कोरोना चाचणीमध्ये तारखेच्या घोळामुळे थोडा फरक असू शकतो. याविषयी फोनवर बोलता येणार नाही. प्रत्यक्ष भेटून सांगता येईल.- डॉ.संतोष बोरसे,तालुका आरोग्य अधिकारी मालेगाव

टॅग्स :Shirpur Jainशिरपूर जैनwashimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या