लोकमत न्यूज नेटवर्कशिरपुर जैन: येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन संस्थांमध्ये दोन दिवशीय वार्षिक यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त भगवान पार्श्वनाथाची भव्य मिरवणूक गावातून काढून महाप्रसादाने या यात्रोत्सवाचा समारोप करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावषीर्ही शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन संस्थानमध्ये दोन दिवशीय वार्षिक यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रा महोत्सवानिमित्त संस्थांनच्यावतीने मोठ्या प्रमाणात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २२ नोव्हेंबर रोजी पार्श्वनाथाच्या अभिषेक पूजन कार्यक्रमाने यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली. सायंकाळी पंडित यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ध्वजारोहण झाले. जयकुमार राऊत यांच्या प्रवचनानंतर पूर्णा अभिषेक पूजन , चढावा बोली, इत्यादी कार्यक्रम पार पडले. त्यानंतर साडेनऊ वाजता पार्श्वनाथाची भव्य मिरवणूक अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर संस्थांमधून काढण्यात आली. या मिरवणुकीत कारंजा, वाशिम, रिसोड ,हराळ, मालेगाव, मेहकर, अकोला, हिंगोली येथील मोठ्या प्रमाणात दिगंबर जैन बांधव सहभागी झाले होते. मिरवणूक वाजत गाजत मुख्य रस्त्याने स्टेशन समोरून ऐतिहासिक कोळी मंदिरात नेण्यात आली. मिरवणूक विसर्जनानंतर संस्थांतर्फे पदयात्री, दानदाता, विधान कत्यार्चा सन्मान करण्यात आला. त्यानंतर नागपूर येथील रमेश अंतीदास उकळकर यांच्यावतीने आयोजित महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला. दरम्यान याप्रसंगी अंतरिक्ष क्षेत्र या वेबसाईटचे उदघाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दिगंबर जैन संस्थान : यात्रोत्सवाचा मिरवणूक व महाप्रसादाने समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 1:28 PM
शिरपुर जैन: येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन संस्थांमध्ये दोन दिवशीय वार्षिक यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त भगवान पार्श्वनाथाची भव्य मिरवणूक गावातून काढून महाप्रसादाने या यात्रोत्सवाचा समारोप करण्यात आला.
ठळक मुद्देदोन दिवशीय वार्षिक यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणूक वाजत गाजत मुख्य रस्त्याने स्टेशन समोरून ऐतिहासिक कोळी मंदिरात नेण्यात आली.मोठ्या प्रमाणात दिगंबर जैन बांधव सहभागी झाले होते.