लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणाºया दिलीप जाधव यांनी २४ फेब्रुवारी रोजी वैयक्तिक कारण देत वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्याकडे सुपूर्द केला.राकाँचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप जाधव यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करीत रिसोड विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारीही मिळविली होती. त्यांना तिसºया क्रमांकाच्या मतावर समाधान मानावे लागले. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही जाधव यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दोन दिवसांपूर्वीच अकोला जिल्ह्यातील दोन माजी आमदारांसह वंचित बहुजन आघाडीच्या राज्यातील जवळपास ४५ जणांनी राजीनामे दिल्याची घटना ताजी असतानाच, वाशिम जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांनी २४ फेब्रुवारी रोजी आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द केला. या वृत्ताला दिलीप जाधव यांनी दुजोरा दिला.
दिलीप जाधव यांनी दिला वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 5:35 PM