लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: येथील पंचायत समिती कार्यालयात विविध कामानिमित्त दरदिवशी शेकडो नागरिक येत असतात. या नागरिकांना अधिकाऱ्यांच्या व्यस्ततेमुळे प्रतिक्षा करणे क्रमप्राप्त ठरते; परंतु या प्रतिक्षेच्या वेळेत त्यांना सुखरूप थांबण्यासाठी सुविधाच उपलब्ध नाही. पावसाळ्याच्या दिवसांत त्यामुळे नागरिकांची मोठी त्रेधा तिरपिट उडत असल्याचे चित्र पाहायला मिळते.महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम १०८मध्ये पंचायत समितीच्या कार्याचे वर्णन करण्यात आले आहे. यामध्ये शेतीविषयक सुधारणांच्या योजनांची अंमलबजावणी करणे, सार्वजनिक आरोग्याच्या सोयी करणे, प्राथमिक शिक्षणाच्या सोयी करणे, पाझर तलावांच्या कामांना गती देणे, जलसिंचनाच्या सोयी करणे, पशुधनाचा विकास करणे, गावागावांना जोडणाºया रस्त्यांची दुरूस्ती करणे, हस्त कलाद्योग व कुटीरउद्योगांना प्रोत्साहन देणे, समाजकल्याणच्या विविध योजना राबवणे आदिंचा समावेश आहे. अर्थातच या कामांशी संबंधित ग्रामीण भागांतील शेकडो लोक पंचायत समिती कार्यालयात दरदिवशी येत असतात. त्यामुळे येथे येणाºयांची संख्या लक्षणीय असते. येथे येणाºया प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधून त्याचे समाधान करणे अधिकारी, कर्मचाºयांचे कर्तव्य असते; परंतु एकाच वेळी अनेकांसोबत संवाद साधणे शक्य नसल्याने अनेक ग्रामस्थांना प्रतिक्षा करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन येथे येणाºया ग्रामस्थांना प्रतिक्षेत थांबण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे; परंतु मंगरुळपीर येथील पंचायत समिती कार्यालयात, अशी सुविधा नाही. त्यातच कार्यालयातील कक्षांची व्याप्ती मर्यादित असल्याने येथे येणाºया लोकांना बाहेर ताटकळत उभे राहावे लागते. पावसाळ्याच्या दिवसांत पाऊस पडत असल्यास या लोकांची मोठी त्रेधा तिरपिट उडते.
मंगरुळपीर पंचायत समितीच्या आवारात नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 3:06 PM