लोकमत न्यूज नेटवर्कआसोला : मानोरा येथील ग्रामीण रुग्णालय अनेक समस्यांच्या विळख्यात असुन रुग्णांना वैद्यकीय अधिका-यांची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. कोणत्याच प्रकारच्या सुविधा दवाखान्यात उपलब्ध नसल्याने रुग्णांची मोठया प्रमाणात गैरसोय होतांना दिसून येत आहे.गोरगरीब रुग्णांवर तालुक्यांच्या ठिकाणी उपचार व्हावे व आरोग्य विषयक सोयी सुविधा मिळाव्या यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करुन तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालय बांधण्यात येते, मात्र येथे नियुक्ती असलेल्या वैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर राहत असल्याने हे रुग्णालय केवळ पांढरा हत्ती ठरत आहे. वैद्यकीय अधिकाºयाअभावी गोरगरीब गरीब रुगणांना शेवटी खाजगी डॉक्टरांकडे जावून आर्थीक भूर्दंड सहन क२ावा लागल आहे. संबधित अधिकाºयांना भ्रमणध्वनी केल्यास त्यांचा मोबाईल स्विच आॅफ येत असल्याने रुग्णांमध्ये मोठया प्रमाणात रोष व्यक्त केल्या जात आहे. तसेच रुग्णालया पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही , रुग्णालयाला चारही बाजुने काटेरी बाभळीने वेढलेले आहे. रुग्णालयात व परिसरात स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. रुग्णालयातील सुविधांअभावी रुग्णांना अकोला किंवा यवतमाळ येथे रेफर केल्या जाते. या कडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज असून सतत गैरहजर राहणाºया वैद्यकीय अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांचवतिने करण्यात येत आहे.
मानोरा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 7:25 PM
आसोला : मानोरा येथील ग्रामीण रुग्णालय अनेक समस्यांच्या विळख्यात असुन रुग्णांना वैद्यकीय अधिका-यांची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. कोणत्याच प्रकारच्या सुविधा दवाखान्यात उपलब्ध नसल्याने रुग्णांची मोठया प्रमाणात गैरसोय होतांना दिसून येत आहे.
ठळक मुद्देवैद्यकीय अधिका-यांची अनुपस्थितीरुग्णांची प्रतिक्षा