वाशिम - जवाहर नवोदय विद्यालय वाशिम येथे आपदा प्रबंधन अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन व जागृकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यासप्रसंगी येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे तसेच शिवाजी जावळे, माधव गोरे, विशाल हिंगमिरे, सुधीर भुसारी इत्यादी हजर होते. स्वागत समारोहानंतर बालासाहेब बोराडे यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती प्रसंगी स्वत:च संरक्षण कसे करायचे याचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या समवेत आलेल्या चमुने विविध प्रकारचे बँडेज कसे करायचे , एखाद्या रुग्णाला तात्पुरती सेवा देवुन दवाखान्यापर्यंत कसे पोहचवावायचे याचे प्रात्यक्षीक करुन दाखविले . तसेच नैसर्गीक आपत्ती ओढवली तर त्यावेळेस स्वत:चे व इतरांचे संरक्षण कसे करायचे याचे प्रात्यक्षीक इयत्ता ९ वी ब विद्यार्थ्यांच्याव्दारे करुन दाखवले. तसेच मॉकडिलचे महत्वही पटवुन सांगितले. त्यानंतर अग्नीशमन दलाची गाडी आणुन लागलेली आग नियंत्रणात कशी आणायची याची प्रात्यक्षीके करुन दाखविले. विद्यार्थ्यांना या सर्व प्रात्यक्षीकांचा विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक जीवनात व सामाजिक जीवनात याचा निश्चितच फायदा होईल असे मत विद्यालयाचे प्राचार्य आर.एच.चंदनशिव यांनी व्यक्त केले.