शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

आपत्ती व्यवस्थापन आठवड्यांतर्गत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 2:37 PM

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन आठवडा साजरा केला जात असून या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार राज्य आणि जिल्हास्तरावर १३ आॅक्टोंबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने ११ ते १८ आॅक्टोंबर २०१८ दरम्यान जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन आठवडा साजरा केला जात असून या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.आपत्ती व्यवस्थापन आठवडा कालावधीत जिल्ह्यातील शाळांमध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य आदी कार्यक्रम होणार आहेत. तसेच मोबाईल व्हॅन, पथनाट्य, प्रदर्शन, आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम (मॉक ड्रील), सभा, मुद्रित साहित्य, बॅनर, डॉक्युमेंटरी, चित्रफित इत्यादी माध्यमातून जनजागृती आणि शासनाचे आपत्ती व्यवस्थापन धोरण तसेच क्षमता बांधणीचे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत, असे हिंगे यांनी सांगितले. नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीपासून बचाव करणे तसेच मानवनिर्मित आपत्ती उद्भवू नये म्हणून घ्यावयाची दक्षता यासंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे. याला म्हणतात आपत्ती व्यवस्थापनआपत्तीपासून निर्माण झालेल्या संकटाला प्रतिबंध करणे, या संकटांचा धोका कमी करणे, आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी क्षमता वाढवणे आणि त्याला तोंड देण्यासाठी सुसज्जता वाढवणे, आपत्तीच्या घटनांमध्ये योग्य तो शीघ्र प्रतिसाद देणे, आपत्तीचे गांभीर्य आणि परिणाम ओळखणे, आपत्तीच्या घटनांमध्ये बाधितांसाठी तातडीने बचाव कार्य करून मदत देणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासह पडलेल्या बांधकामांची पुनर्रचना करणे' यासाठी सततच्या व एकत्रित प्रक्रियेसाठी नियोजन व आयोजन करून आणि समन्वय साधत उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याला आपत्ती व्यवस्थापन म्हटले जाते.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा