माळशेलू येथील युवक सुशील राठोड (वय २५) हा युवक एमएच-३७, ई-७५१८ हा शेलूबाजार येथून पिंजरमार्गे घरी परत जात असताना वनोजापासून २ किलोमीटर अंतरावर दुचाकीचा अपघात घडल्याने गंभीर जखमी झाला. या युवकाला अर्धा तास कोणीही उचलेले नाही किंवा मदतीचा प्रयत्नही केला नाही. या घटनेची माहिती वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य सचिन राठोड यांना मिळताच ते तत्काळ आपले सहकारी प्रवीण गावंडे, आदित्य इंगोले व उमेश राठोड आदींनी घटनास्थळी दाखल होत १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले; परंतु या युवकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांनी वनोजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. काळे यांना फोन करून रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतली व तत्काळ वनोजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने अकोला येथे पाठवले.
गंभीर जखमीच्या मदतीला धावले आपत्ती व्यवस्थापनाचे युवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:38 AM