शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

व्यसनमुक्ती केंद्राची मान्यता रद्द करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 8:07 PM

वाशिम : ज्योतीबा फुले सेवा ट्रस्ट नांदेड अंतर्गत शहरातील आय.यु.डी.पी. कॉलनी येथे सुरु असलेल्या ज्योतीबा फुले सेवा ट्रस्ट या केंद्र सरकारव्दारा अनुदानित व्यसनमुक्ती केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून संस्थेतील या भ्रष्टाचाराची चौकशी करुन संबंधीत संस्थाचालक व सचिव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन भाजपाचेवतिने देण्यात आले होते. यासंदर्भात २४ सप्टेंबर रोजी लोकमतच्यावतिने वृत्त प्रकाशित केल्याबरोबर केंद्राने वाशिमातील गाशा गुंडाळला असल्या संदर्भात २६ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले. दरम्यान या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी यांनी पाहणी करुन आढळलेल्या बाबीवरुन  आयुक्त समाज कल्याण म.रा.पुणे यांना पत्र पाठवून ज्योतीबा फुले सेवा ट्रस्ट नांदेडव्दारा संचालीत व्यसनमुक्ती केंद्र वाशिमची मान्यता रद्द करण्याबाबत सुचविण्यात आले आहे.

ठळक मुद्देज्योतीबा फुले सेवा ट्रस्ट व्यसनमुक्ती कागदावरच प्रकरणसमाजकल्याण आयुक्तांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ज्योतीबा फुले सेवा ट्रस्ट नांदेड अंतर्गत शहरातील आय.यु.डी.पी. कॉलनी येथे सुरु असलेल्या ज्योतीबा फुले सेवा ट्रस्ट या केंद्र सरकारव्दारा अनुदानित व्यसनमुक्ती केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून संस्थेतील या भ्रष्टाचाराची चौकशी करुन संबंधीत संस्थाचालक व सचिव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन भाजपाचेवतिने देण्यात आले होते. यासंदर्भात २४ सप्टेंबर रोजी लोकमतच्यावतिने वृत्त प्रकाशित केल्याबरोबर केंद्राने वाशिमातील गाशा गुंडाळला असल्या संदर्भात २६ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले. दरम्यान या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी यांनी पाहणी करुन आढळलेल्या बाबीवरुन  आयुक्त समाज कल्याण म.रा.पुणे यांना पत्र पाठवून ज्योतीबा फुले सेवा ट्रस्ट नांदेडव्दारा संचालीत व्यसनमुक्ती केंद्र वाशिमची मान्यता रद्द करण्याबाबत सुचविण्यात आले आहे.प्रादेशीक आयुक्त समाज कल्याण विभाग, अमरावती मार्फत आयुक्त समाज कल्याण म.रा.पुणे यांना जिल्हापरिषद समाजकल्याण अधिकारी यांनी पाठविलेल्या पत्रात नमूद केले की,  ज्योतीबा फुले  सेवा ट्रस्ट नांदेड र.जी.महा.२१३/९३ नांदेड एफ  २८५४ नांदेड व्दारा संचालीत व्यसनमुक्ती  केंद्र वाशिम हा केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत सन २००१ - ०२ एकुण व्यसनमुक्ती  कार्यरत आहे. सदर संस्था केंद्र शासनाकडुन व्यसनमुक्ती कार्यासाठी नियमित अनुदान प्राप्त करीत  असुन सन २०१५ -१६ मध्ये रु.१८, ९९, १८९० व सन २०१६ -१७ मध्ये रु.९,४९,५९०, इतके अनुदान प्राप्त झाले आहे. सदर संस्थेबाबत धनंजय मोहनराव हेंदे्र शहराध्यक्ष भाजपा वाशिम  यांचेकडून सदर संस्था बंद असल्याबाबत तक्रार प्राप्त असुन त्या अनुषंगाने  दि.२९ सप्टेंबर २०१७ रोजी दुपारी मा.लखन मलीक आमदार वाशिम व मंगरुळपीर, यांचे कक्षात  आयोजित  बैठकीत आमदार यांनी सदर संस्थ नियमानुसार कार्य करीत नसुन तिची मान्यता रदद करण्यात यावी, सदर संस्थेला दिलेले अनुदान वसुल करण्यात यावे व संस्थाचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहे. त्यानुसार सदर व्यसनमुक्ती केंद्राला केंद्र ज्योतीबा फुले सेवा ट्रस्ट नांदेड व्दारा संचालीत  व्यसनमुक्ती केंद्र वाशिमला २७ सप्टेंबर २०१७ रोजी दुपारी वाजता भेट दिली असता केंद्राचे मुख्य गेट व  दरवाजे यांना कुलुप लावले असुन केंद्राची इमारत बंद स्थितीत आढळुन आली तसेच केंद्राच्या आजुबाजुकडील रहिवासांना सदर केंद्राबाबत विचारता केली असता सदरचे केंद्र बंद असल्याचे त्यांनी सांगितले. सदरचे व्यसनमुक्ती केंद्र शासनाकडून व्यसनमुक्ती कार्य करणेसाठी नियमित अनुदान प्राप्त करीत असुन देखील व्यसनमुक्ती  केंद्र बंद ठेवणे ही अतिशय गंभीर बाब असुन त्याबाबत संस्थेस करणे  दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु सदर व्यसनमुक्ती  केंद्र हे बंद स्थितीत असल्याने सदर व्यसनमुक्ती केंद्राची मान्यता रद्द करुन संस्थेस या समोर कोणतेही अनुदान वितरीत करण्यात येवु नये असे या कार्यालयाव्दारे प्रास्तावित करण्यात येत आहे.  तसेच संदर्भीय बैठकीत आमदार यांनी  निर्देश दिल्याप्रमाणे सदर संस्थेस देण्यात आलेले अनुदान वसुल करता येईल किंवा कसे ,सदर संस्थाचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करता येईल किंवा कसे, याबाबत आपले स्तरावरुन योग्य मार्गदर्शन करण्याची मागणीही पत्रातून करण्यात आली आहे.