भर जहागीर : कोरोना संसर्गाचे प्रभाव कमी होत असल्याने मागील एक वर्षापासून बंद केलेल्या शाळा शिक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार परत सुरू होण्याचे आदेश धडकल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले, परंतु अनेक गावांतील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या मागील एक ते दीड महिन्यापासून निरंक असताना सुद्धा शाळा व ग्रामपंचायतींचा शाळा सुरू करण्यासंदर्भात निरुत्साह दिसत असल्याने शेकडो विद्यार्थ्यांसह पालक वर्गामध्ये नाराजीचा सुरू उमटत आहे.
परिसरामध्ये मांडवा, भर जहागीर, मोप, लोणी, वाकद, एकलासपूर व मोठेगाव या ठिकाणी विद्यालय आहे. सदर विद्यालयामध्ये वर्ग आठवी ते बारावीपर्यंत शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी आतूर झालेले आहे. शिक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार स्थानिक ग्रामपंचायतींनी शाळा प्रारंभासाठी कोरोना संसर्गासंदर्भातील माहितीचे पत्र देणे बंधनकारक केले आहे.
परंतु शाळा-महाविद्यालयाने सुद्धा यासाठी ग्रामपंचायतकडे शाळा प्रारंभाकरिता पाठपुरावा करणे आवश्यक असून, १५ जुलैपासून शाळांना प्रारंभ करणे आवश्यक असताना परिसरातील भर जहागीर, मोप, लोणी, वाकद, शेलुखडशे, मोठेगाव, एकलासपूर येथील शाळा अद्यापही बंदच दिसत आहेत.
(वार्ताहर)