काजळेश्वर येथे दरवर्षी श्रीसंत निवृत्ती महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यानिमित्त सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रम गावकऱ्यांच्या सहकार्यातून पार पडतात. यंदा या पुण्यतिथी साेहळ्याला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली. त्यात शरद महाराज गोरले यांच्या मधुर वाणीतून २.३० ते ४ .३० दरम्यान प्रवचनाचा कार्यक्रम पार पडत आहे. हा कार्यक्रम ९ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्याशिवाय दररोज रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होत असून, भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संदीप उपाध्ये यांनी केले आहे.
-----------
ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
काजळेश्वर: ग्रामीण भागांत पसरत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेत काजळेश्वर येथील आरोग्य उपकेंद्राकडून डॉ. प्रशांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
----------
शेतशिवारात नीलगायींचा धुडगूस
काजळेश्वर : परिसरात बहरलेल्या रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांत नीलगायींचे कळप धुडगूस घालून पिकांचे नुकसान करीत आहेत. वन विभागाने या वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी शनिवारी केली.