वाशिम जिल्हा परिषदेने यापूर्वी सन २०१७ मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नत्या केल्या होत्या. परंतु मध्यतंरीच्या काळात या पदोन्नत्या परत केल्या गेल्या नसल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केल्या जात आहे. नव्यानेच रूजू झालेले शिक्षणाधिकारी रमेश तांगडे यांची शिक्षकांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीमध्ये तांगडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नतीबाबत शिक्षकांनी १० जून २०१४ ची अधिसूचना देखील शिक्षणाधिकारी यांचे निदर्शनास आणून दिली. यावेळी शिक्षणाधिकारी तांगडे यांनी यावर आपण सकारात्मक विचार करून पुढील कार्यवाही करू असे आश्वासन दिले.यावेळी जिल्हाध्यक्ष दत्तराव इढोळे, जिल्हा नेते विलासराव गोटे, आत्माराम आरू, स्वाती इंगाले, साने गुरुजी शिक्षक संघटनेचे नारायणराव सरनाईक यांच्यासह आदी शिक्षकांची उपस्थिती होती.
पदोन्नतीबाबत शिक्षाणाधिकाऱ्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:25 AM