लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार: ‘ना जातीसाठी ना धर्मासाठी, एक होऊ फक्त बापासाठी’, हे ब्रीदवाक्य घेऊन मंगरूळपीर तालुक्यातील युवा शेतकर्यांनी एकत्र येत ११ फेब्रुवारीला ‘दुष्काळ परिषद’ घेतली. यात शेतकर्यांना जाणवणार्या विविध अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. यासह शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध परिषदेत सहभागी मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून चांगलीच आगपाखड केली.शेलूबाजार येथील लक्ष्मीचंद हायस्कुलमध्ये आयोजित या दुष्काळ परिषदेस प्रमुख वक्ते म्हणून वीज प्रश्न व शेतकरी कर्ज प्रकरणाचे अभ्यासक ललीतकुमार बहाडे, शेतीप्रश्नाचे अभ्यासक प्रा. उल्हास जाधव तथा शेतकरी नेते गजानन अमदाबादकर यांची उपस्थिती होती. ‘दुष्काळाची परिभाषा आणि उपाययोजना’, या विषयाला बहाडे यांनी हात घातला. ‘ग्रामीण समस्या व शहरी नागरिकांची भूमिका’, या विषयावर प्रा. उल्हास जाधव यांनी, तर ‘भावी आंदोलनात युवकांची भूमिका’ या विषयावर शेतकरी नेते गजानन अमदाबादकर यांनी मार्गदर्शन केले. सन १९६0-१९७0 च्या शतकात धान्याला मोताज असलेला भारत देश सध्या मात्र धन-धान्याने समृद्ध झालेला आहे. हा चमत्कार घडवून आणणार्या शेतकर्यांच्या वाट्याला मात्र केवळ कर्जबाजारीपणा आला आहे. शेतात काबाडकष्ट करून शेतीमाल उत्पादनवाढीचा फायदा शेतकरी सोडून इतर सर्व घटकांना झाला. याचा परिणाम देशात होणार्या लाखो शेतकरी आत्महत्येच्या स्वरूपात समोर आला आहे, असे सांगून शेतकर्यांचा विचार कोण करेल, असा प्रश्न अमदाबादकर यांनी यावेळी उपस्थित केला. दुष्काळ परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी शेलुबाजार, हिरंगी-खेर्डा, चोरद-जनुना, वनोजा, माळशेलू, नांदखेडा, धोत्रा (गणेशपूर), तर्हाळा, ईचा-नागी, शेंदूरजना मोरे, चिखली, पिंप्री खु., पिंप्री अवगण, अरक-चिंचाळा, कंझरा, पिंपळखुटा संगम, मसोला ब., भुर-पूर-रुई-तांदळी, गोगरी, पेडगाव, येडशी, पार्डी ताड, लाठी, तपोवन, मानोली आदी गावांमधील युवा शेतकर्यांनी पुढाकार घेतला. शेतकरी प्रतिनिधी म्हणून दामोदर इंगोले, चेतन महल्ले, श्रीकांत ठाकरे, रवी ठाकरे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व परिषदेमागील भूमिका निमंत्रक अर्जुन भीमराव सुर्वे यांनी मांडली. कार्यक्रमाचे संचलन वैभव भिवरकर तथा आभार प्रदर्शन मधुकर ढोके यांनी केले.
दुष्काळ परिषदेत शेतकर्यांच्या अडीअडचणींवर झाली चर्चा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 1:54 AM
शेलूबाजार: ‘ना जातीसाठी ना धर्मासाठी, एक होऊ फक्त बापासाठी’, हे ब्रीदवाक्य घेऊन मंगरूळपीर तालुक्यातील युवा शेतकर्यांनी एकत्र येत ११ फेब्रुवारीला ‘दुष्काळ परिषद’ घेतली. यात शेतकर्यांना जाणवणार्या विविध अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. यासह शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध परिषदेत सहभागी मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून चांगलीच आगपाखड केली.
ठळक मुद्देयुवा शेतकर्यांचा पुढाकार शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध सहभागी मान्यवरांची आगपाखड