याबाबत रस्ता काम करणाऱ्या कंपनीचे जनसंपर्क अधिकारी तिवारी यानी सांगितले की, सर्वप्रथम कंपनीकडून रस्ता बनविणे प्राथमिकता असून जोपर्यंत समस्या समोर येत नाही तोपर्यंत त्या प्रश्नाचे सोडवणूक करता येत नाही . राष्ट्रीय महामार्ग मेडशी येथून गेलेला असल्याने दळणवळणाची साधने मेडशी गावातून जात होती. नवीन चौपदरीकरणाचे काम शासनस्तरावरून सुरू आहे . गावाला आधी बायपास काढण्यात आले, परंतु हा बायपास नसून मेडशीचा वळण मार्ग आहे सध्या तरी असे चित्र दिसत आहे . कारण की महामार्गातून येण्याकरिता कोणताही जंक्शन सध्यातरी देण्यात आलेला नाही. पातूरकडून येत असताना आणि मालेगावकडून मेडशीकडे
येत असताना बायपास असलेल्या रस्त्याला येण्याकरिता कोणतीच व्यवस्था नसल्याने व जंक्शन करिता जागा सध्यातरी अधिग्रहित न झाल्याने जंक्शनचा प्रश्न उपस्थित झाला आहे, लवकरच तो प्रश्न निकाली निघेल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मेडशी सरपंच शेख जमीर शेख गनिभाई यांना आश्वासन दिले. यावेळी सरपंच शेख जमीर शेख गनिभाई , माजी ग्रा. पं. सदस्य मो. मजहर, प्रसाद पाठक, डिझाईन इंजिनिअर रवी तेजा, ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते.