महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी ऑल स्पोर्ट संघटना कार्यरत असून खेळाडूंच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच अडचणीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी संघटनेकडून पुढाकार घेतला जातो. दरम्यान, वाशिम येथे पार पडलेल्या बैठकीत संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते बाळासाहेब गोटे यांची तर सचिवपदी प्रल्हाद आळणे यांची नियुक्ती करण्यात आली. खेळाडूंना व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जाणवणाऱ्या अडचणी तसेच आगामी काळात होणाऱ्या स्पर्धांविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी संजय शिंदे, अनिल थडकर, हित्वा रन्नू बेनीवाले, सुनील देशमुख, राजदीप मनवर, अनिल देशमुख, विनोद जवळकर, विक्की खोब्रागडे, ॲड. रुपेश चौधरी आदींची उपस्थिती होती.
..........................
खेळाडूंना सुविधा पुरविण्याचा निर्णय
ऑल स्पोर्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत क्रीडाविषयक अडचणी दूर करण्यासह मैदानावर विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.