लोकमत न्यूज नेटसर्कमानोरा (वाशिम) : आगामी पाच वर्षासाठी ग्राम पंचायतीचा विकास आराखडा तयार करण्यासाठी पंचायत समिती गणनिहाय एक दिवशीय कार्यशाळेला २० सप्टेंबरपासून सुरूवात झाली असून, २१ सप्टेंबरपर्यंत १० पेक्षा अधिक ठिकाणी कार्यशाळा पार पडल्या. यावेळी गाव विकासावर चर्चा झाली.आमचं गाव आमचा विकास या उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्राम पंचायतींना सक्षम करण्यासाठी आगामी पाच वर्षाकरिता आराखडा तयार होत आहे. त्यासाठी मानोरा तालुक्यातील पंचायत समितीच्या गणानुसार समाविष्ठ गावांना एका ठिकाणी बैठक घेवुन सकाळी दिवशीय कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन होत आहे. इंझोरी येथे २० सप्टेंबर रोजी गोमेश्वर संस्थान येथे विस्तार अधिकारी नायसे, दिपा शरद कांबळे यांनी मार्गदर्शन केले. इंझोरी, जामदरा, म्हसणी, तोरणाळा, दापुरा खु, अजनी येथे सरपंच, सचिव उपस्थित होते. कुपटा येथे २० सप्टेंबर रोजी महादेव मंदिर सभागृहात कुपटा, एकलारा, पारवा, वापटा, चोंढी, येथील सरपंच, सचिवांना मार्गदर्शन करण्यात आले. २० सप्टेंबर रोजी तळप येथे कारखेडा, तळप. बु. कार्ली, बोरव्हा, येथे मार्गदर्शन केले. कारखेडा येथील शंकरगीरी महाराज सभागृहात कार्यशाळा पार पडली. गिरोली पंचायत समिती गणात विस्तार अधिकारी संजय भगत, निर्मला रामदास केराम यांनी यांनी गिरोली, भिलडोंगर, गिर्डा, खापरी, येथील सरपंच, सविव, बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केले. उद्घाटक म्हणुन गिरोलीच्या सरपंच आरती खुशाल तवर होत्या. २१ सप्टेंबर रोजी इंझोरी गणातील दापुरा बु. येथे महादेव मंदिर सभागृहात दापुरा बु. चौसाळा, रद्राळा, मोरगव्हाण, भोयणी, जनुना खुर्द भोयणी, जनुना खुर्द येथील सरपंच सचिवांना प्रशिक्षण देण्यात आले. कुपटा पंचायत समिती गणात विसतार अधिकारी एस.बी. चव्हाण, सुशिला दादाराव ठाकरे यांनी धामणी, आमगव्हाण, कोंडोली, आसोला बु.हिवरा बु. देवठाणा, गावातील सरपंच, सचिव यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत आगामी पाच वर्षाच्या आराखडासंदर्भात नियोजन करण्यात आले. कार्यशाळेला सर्वच गावाचे पदाधिकारी ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.२३ सप्टेंबर रोजी फुलउमरी, पोहरादेवी, पाळोदी, २४ सप्टेंबर रोजी आसोला खुर्द, सावळी, वरोली व शेंदुरजना येथे त्या त्या पंचायत समिती गणानुसार कार्यशाळा होणार आहेत, असे गटविकास अधिकारी सुरज गोहाड यांनी सांगितले.
कार्यशाळेतून गाव विकासावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 6:07 PM