मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार अमित झनक होते. जि.प.चे उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, जि.प. सदस्य उषा जाधव, मआविमचे विभागीय सनियंत्रण अधिकारी केशव पवार, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, राजेश नागपुरे, प्रभारी तहसीलदार रवी राठोड, कृउबासचे सभापती किसनराव घुगे, केंद्र अध्यक्ष सुनीता गायकवाड, मंगला सरनाईक, सुरेश शिंदे, डॉ. नीलेश मानधने, प्रवीण पाटील, सुभाष वाझुळकर, अंबादास पाटील, प्रिया पाठक, नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्योती ठाकरे म्हणाल्या, शासनाने मआविमच्या बचतगटांसाठी ५२३ कोटी रुपये मंजूर करून नव तेजस्विनी प्रकल्पाला सुरुवात केली आहे. या प्रकल्पामुळे महिलांच्या उद्योगास चालना मिळेल. महिला सक्षमीकरणाची चळवळ अधिक बळकट व गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: लक्ष देऊन आहेत. त्यामुळे महिलांनी लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून प्रगती साधावी, असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन शरद कांबळे यांनी केले. केशव पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेखापाल कीर्ती इंगळे, सह्योगिनी पुष्पा गवळी, चंद्रभान माने, जया गायकवाड, सुनीता सुर्वे, भारती चक्रनारायण यांनी परिश्रम घेतले.
.........................
बॉक्स :
अन्नदान करणा-या बचतगटांचा सत्कार
कोविड काळात ज्या बचतगटांनी गरीब, गरजूंना अन्नदान केले, अशा बचतगटांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये जय गजानन महिला बचत गट (भेरा), दुर्गामाता गट (कोलगाव) यांचा समावेश आहे.