मंगरुळपीर: शहरात गेल्या दीड महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने नागरिकांचे पाण्याअभावी मोठे हाल होत आहेत. पालिका प्रशासनाच्या प्रस्तावित सोनल ते मोतसावंगा धरणापर्यंत पाणी आणण्याच्या योजनेचे काम सुरू झाले नसतानाच त्यात अनेक अडचणीही निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने पर्यायी उपाय योजना करणे आवश्यक होते; परंतु त्याचा प्रयत्न झाला नाहीच शिवाय शहरातील बंद पडलेले हातपंप दुरुस्त करण्याचीही तसदी घेण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या समस्येत अधिकच भर पडली आहे. मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा धरण आटल्याने शहरात १५ ते २० दिवसांत एकदाच पाणी पुरवठा होत आहे. त्यातही पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना दुसºया, तिसºया दिवशीच पाण्यासाठी फिरावे लागते. अशात शहरातील हातपंप नागरिकांसाठी मोठा आधार ठरू शकतो; परंतु शहरातील बरेच हातपंप बंद पडले आहेत. त्यामुळे पाणी मिळेल कोठून हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सुरू असलेल्या हातपंपावर सकाळी ६ वाजतापासून नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. त्यामुळे पाण्यासाठी वादही होत असून, यामुळे एखादवेळी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्यासाठी मंगरुळपीर शहरात हाहाकार उडाला असल्याने पालिकेने तातडीने हातपंप दुरुस्तीची मोहिम हाती घेण्यासह पर्यायी उपाय योजना करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
पाणीटंचाईच्या काळातही मंगरुळपीर शहरात हातपंप दुरुस्तीबाबत उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 2:28 PM
मंगरुळपीर: शहरात गेल्या दीड महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने नागरिकांचे पाण्याअभावी मोठे हाल होत आहेत. पालिका प्रशासनाच्या प्रस्तावित सोनल ते मोतसावंगा धरणापर्यंत पाणी आणण्याच्या योजनेचे काम सुरू झाले नसतानाच त्यात अनेक अडचणीही निर्माण झाल्या आहेत.
ठळक मुद्दे मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा धरण आटल्याने शहरात १५ ते २० दिवसांत एकदाच पाणी पुरवठा होत आहे. अशात शहरातील हातपंप नागरिकांसाठी मोठा आधार ठरू शकतो; परंतु शहरातील बरेच हातपंप बंद पडले आहेत. सुरू असलेल्या हातपंपावर सकाळी ६ वाजतापासून नागरिकांची तोबा गर्दी होत आहे.