लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर नागरिकांनी संचारबंदी तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या सुचनांकडे दुर्लक्ष करणाºया वाहनधारकांविरूद्ध २१ मे पासून कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली. चार दिवसात १४० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन केले जात आहे. अनेकजण विनाकारण चकरा मारतात तसेच वाहतूक नियम पाळत नाहीत.जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी २१ मे रोजी रिसोड शहरात तळ ठोकून वाहतुकीचे नियम मोडणाºयांविरूद्ध कारवाईची मोहिम सुरू केली. स्थानिक वाशिम नाका येथे विनानंबर, फॅन्सी नंबर प्लेट, लायसन्स नसणे तसेच कोणतेही कारण नसताना विनाकारण फिरणे आदी कारणांवरून पहिल्या दिवशी जवळपास ५० वाहनधारकांविरूद्ध कारवाई केली. २२ मे रोजी जवळपास ३२ आणि २३ मे रोजी जवळपास ३८, २४ मे रोजी २० अशी एकूण १४० जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली. वाहतुकदारांनी वाहतूक नियमाचे पालन करावे, कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये, अशा सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या.
वाहतूक नियमांना ठेंगा; १४० जणांवर कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 4:50 PM