शिखरचंद बागरेचा ।लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पश्चिम विदर्भासह मराठवाड्यात विशिष्ट सोयी-सुविधांमुळे नामांकित ठरलेली वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या अडते व व्यापाºयांच्या वादामुळे चर्चेत आली आहे. याच वादामुळे गत दोन दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाशिम तालुक्यातील कास्तकारांसह हिंगोली व पुसद जिल्ह्यातील कास्तकारसुद्धा येथे सोयाबीन, हरभरा, ज्वारी, तूर, भुईमूग, हळद, मूग, उडीद, गहू, इत्यादी प्रमुख शेतमाल विक्रीसाठी आणतात. शेतकºयांच्या हितासाठी शासनाने शेतकºयांकडून ‘अडत वसुली’ची पद्धत बंद करून व्यापाºयांनी अडत्यांना अडत द्यावी, असा निर्णय घेतला. शासनाच्या निर्णयानुसार वाशिम बाजार समितीत व्यापाºयांनी अडत्यांना १.४० रुपये दराने अडत द्यायला सुरुवात केली. सदरची अडत ही इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त असताना वाशिम बाजार समितीत काही अडते १.४० रुपयांऐवजी २ रुपये शेकडा अडतची मागणी लावून धरली. यावरून अडते व व्यापाºयांमध्ये वादाची ठिणगी पडली. या दोघांच्या वादात शेतकरी मात्र भरडून निघत आहे. शासन शेतकºयांच्या हितासाठी विविध योजना राबवित आहे, तर दुसरीकडे अडते व व्यापारी मात्र शेतकºयांना वेठीस धरत असल्याचा प्रकार वाशिम बाजार समितीत पाहावयास मिळत आहे.शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणल्यानंतर अडते वेगवेगळ्या मार्गाने शेतकºयांकडून आपला खर्च वसूल करण्याचे प्रकारही घडतात. शेतकºयांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत.शेतकºयांचा शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणल्यानंतर थेट व्यापाºयांनी खरेदी करणे शेतकºयांना अपेक्षित आहे. याकडे बाजार समिती प्रशासनाने विशेष लक्ष देऊन शेतकरी हितासाठी अडते व व्यापारी यांच्यामधील वाद संपुष्टात आणावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.अडते व्यापाºयांकडून जादा अडतची मागणी करीत आहेत. व्यापारी जादा अडत देण्यास तयार नाही. यामध्ये साहजिकच शेतकरी बांधव हा या दोघांच्या वादात अडकला आहे. हा प्रश्न सुटावा व बाजार समिती सुरळीत सुरू व्हावी, यासाठी मंगळवारी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत सर्वमान्य तोडगा काढून बाजार समितीचा कारभार सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.- नारायणराव गोटे, सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशिम.अडते व व्यापारी यांनी शेतकºयांना कोंडीत धरले असून, दोन दिवसांपासून बाजार समिती बंद आहे. शेतकºयांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा, यासाठी आपण जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रारसुद्धा दिली आहे. कमिशनवर अडत न वाढविता कमी कमिशनमध्ये जे अडते शेतकºयांचा शेतमाल घेण्यास तयार असतील, तर बाजार समितीने बाजार समिती उघडून शेतकºयांचा शेतमाल विक्रीस बोलवावा.- बंडू महाले, तज्ज्ञ संचालककृ.उ.बा.स. वाशिमजादा कमिशनची मागणी करून अडत्यांनी बाजार समिती बंद पाडली आहे. हा शेतकºयांवर घोर अन्याय आहे. यासंदर्भात अडते व व्यापारी यांनी समन्वयातून तोडगा काढावा व शेतकºयांना न्याय देणे अपेक्षित आहे. केवळ कमिशनवाढीसाठी शेतकºयांना वेठीस धरणे योग्य नाही.- राजू चौधरी, शेतकरी, पार्डी टकमोर, ता.जि. वाशिम
अडते, व्यापा-यांत वाद; व्यवहार ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:50 AM
वाशिम : पश्चिम विदर्भासह मराठवाड्यात विशिष्ट सोयी-सुविधांमुळे नामांकित ठरलेली वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या अडते व व्यापाºयांच्या वादामुळे चर्चेत आली आहे. याच वादामुळे गत दोन दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
ठळक मुद्देशेतकरी हवालदिलदोन दिवसांपासून वशिम बाजार समिती बंदसमिती बंद असल्याने शेतकरी हवालदिल