मालेगाव नगरपंचायतमध्ये एकूण १७ वाॅर्ड असून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सन २०१८-१९ मध्ये २ कोटी ९१ लाख रुपये निधी प्राप्त झाला होता. तसेच २०१९ -२० मध्ये २९ लाख ३० हजार इतका निधी मिळाला होता. या निधीमधून वाॅर्ड क्रमांक ३ मध्ये सन २०१८-१९ मध्ये ७९९९२५६ रुपये तर सन २०१९-२० मध्ये २३,२३,३२१ रुपये इतका निधी खर्च करण्यात आला. तसेच वाॅर्ड क्रमांक ७ मध्ये ९,५५,९७९ रुपये, वाॅर्ड क्रमांक ८ मधे ७१,०५,१३४ रुपये तसेच वाॅर्ड क्रमांक ९ मध्ये ५,०२,५१८ रुपये आणि वाॅर्ड क्रमांक १७ मध्ये १९,११,१२१ रुपये असा निधी सन २०१८-१९ मध्ये खर्च करण्यात आला. हा निधी ज्या वाॅर्डात दलित वस्ती मोठ्या प्रमाणात आहे, त्या वाॅर्ड क्रमांक १३ व १४ मध्ये दिल्या गेला नाही. मात्र, वाॅर्ड क्रमांक १७, ७ व ९ या वॉर्डात दलित वस्ती नसतानासुद्धा मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला. हा दलित बांधवांवर अन्याय असून याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यावेळी सत्तेत असणाऱ्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून हा अनियमितपणा व भ्रष्टाचार केल्याचा आरोप पखाले यांनी केला आहे.
दलित वस्ती निधी वाटपात गाेंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:24 AM