लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरताना शेतक-यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकºयांनी राज्यव्यापी संपाचे हत्यार उपसल्यानंतर, राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफीचा निर्णय जाहिर केला. यानुसार २००९ पासून ते ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याशिवाय सन २०१२ -१३ ते २०१५-१६ या वर्षात पीककर्ज पुनर्गठण केलेल्या; पण ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना कर्जमाफीच्या कक्षेत घेण्यात आले. तसेच नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना २५ हजार रुपयांपर्यंत अथवा २५ टक्के प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. यासाठी पात्र शेतकºयांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येत आहेत. वाशिम जिल्ह्यात ३४६ आपले सरकार केंद्र, १३३ महा ई सेवा केंद्र, ३०९ बायोमॅट्रिक मशीन अशा ठिकाणी शेतकºयांना मोफत स्वरुपात आॅनलाईन अर्ज व घोषणापत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, सर्व्हर डाऊन होणे, ‘थम्ब’ न घेणे, नेट कनेक्टिव्हिटी न मिळणे आदी तांत्रिक कारणांमुळे अर्ज भरण्यास विलंब होत आहे. ग्रामीण भागात तर शेतकºयांना आपले सरकार, महा-ई सेवा केंद्रांवर तासन-तास ताटकळत बसावे लागत आहे.
तांत्रिक अडचणींमुळे कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेत व्यत्यय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 7:18 PM
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरताना शेतक-यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाथकबाकीदार शेतक-यांना मिळणार दीड लाख रुपये कर्जमाफीचा लाभ